देशासाठी एका घराने किती त्याग करायचा?:शरद पवार यांचा मोदींच्या विधानावर पलटवार, सुनील टिंगरे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल
शरद पवार यांनी शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पवार म्हणाले की, सभेला येताना एका आमदाराचे मोठे बॅनर पाहिले ‘आपला आमदार, काम दमदार पण आमदार’. सुनील टिंगरे हे कुणाच्या पक्षातुन निवडून आले? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी काढला? सगळ्या हिंदुस्थानाला माहिती आहे. पक्षाच्यावतीने तुम्हाला संधी दिली, काम करावे अशी आमची अपेक्षा होती. पण तुम्ही सोडून गेले ते ठीक आहे का? निवडणुकीत तुमचा कसा बंदोबस्त करायचा ते आता ही जनताच ठरवणार, पण चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देऊ नका, असा धमकीवजा इशारा शरद पवार यांनी टिंगरे यांना दिला आहे. पुण्यातील खराडी येथील सभेत ते बोलत होते. यावेळी सुनील टिंगरे यांचे विरोधक माजी आमदार बापूसाहेब पठारे आणि दहा नगरसेवक यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. टिंगरे यांना सत्तेची मस्ती चढलीय- शरद पवार पवार पुढे म्हणाले की, कल्याणीनगर येथे भीषण अपघात झाला आणि त्यात दोघांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. त्यांना मदत करणे सोडून त्या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांना आमदार सुनील टिंगरे पोलिस स्टेशनला जाऊन मदत करत होते. तुम्ही मतं पक्षाच्या नावाने मागितली. माझ्या नावाने मतं मागितली. लोकांनी श्रध्देने मते दिली. त्यांना उत्तरदायित्व असण्याऐवजी, आमदार झाल्यावर लोकांना मदत करण्याऐवजी चुकीचे काम करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यांना सत्तेची मस्ती चढलीय. चुकीच्या गोष्टी तरुण पिढी करते, ड्रग आहारी जाते, भरधाव गाडी चालवून तरुणांना उद्ध्वस्त करता त्यांना पाठीशी घातले जाते. याबाबत लाज वाटली पाहिजे, असे सांगत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवार म्हणाले, पुण्याच्या पोलिस आयुक्त यांनी सांगितले की या प्रकरणात काही जणांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली आहे. यामध्ये आमदार असून बिल्डिंगरी यांचा देखील समावेश असून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांनी या आमदाराबाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर फिरून 400 पारचा नारा देत होते. 400 च्या खाली जागा घेणार नाही, असा दावा करत होते, लोकांना ही वाटत होते. मोदी है तो मुमकिन है, मात्र, मोदी 400 जागा घेऊन पुन्हा पंतप्रधान होणार याची लोकांना चिंता होती. मोदींचा 400 पारचा नारा हाणून पाडला- पवार या जागा इतक्या कशासाठी होत्या तर महागाई, बेकारी कमी करण्यासाठी नाही तर देशाची संविधान चौकट त्यांच्या सहकाऱ्यांना उद्ध्वस्त करायची होती. देशाची घटना त्यांना बदल्याची होती. त्यामुळे माझ्यासारखे लोक अस्वस्थ होते कारण ते लोकांच्या अधिकारावर त्यांनी संकट निर्माण केले असते. त्यामुळे अनेक पक्षाचे नेते एकत्र येऊन त्यांनी इंडिया आघाडी निर्माण केली आणि लोकांच्या मदतीने मोदी यांचा ४०० पारचा डाव हाणून पाडला. पाच वर्षांपूर्वी महारष्ट्रामध्ये काँग्रेस आणि आमचे 48 पैकी केवळ पाच खासदार होते ते आताच्या निवडणुकीत 31 झाले आहे. आम्ही दहा पैकी आठ जागा पक्षाच्या निवडून आणल्या आहे. हेच चित्र आता विधानसभेला पुन्हा करायचे आहे. केंद्र सरकारने आता नवीन ठराव मंजूर केला की, एक देश ,एक निवडणूक त्यामुळे सर्व निवडणूक एकाचवेळी होतील असे जाहीर केले. पण निवडणूक आयोगाने हरियाणा, जम्मू काश्मीर निवडणूक वेगळी आणि महारष्ट्र निवडणूक वेगळी का घेतली आहे. नेहरू, गांधींबद्दलही मोदींच्या वक्तव्यावर पवारांचा पलटवार पुढे ते म्हणाले, नरेंद्र मोदी म्हणतात की कुटुंबासाठी विरोधक राजकारण करतात. पण या लोकांचं योगदान नाही का? जवाहरलाल नेहरू 14 वर्षे तुरुंगात होते. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. त्यांची हत्या झाली. राजीव गांधींनी नवीन तंत्रज्ञान आणले. त्यांची हत्या झाली. ही साधीसुधी माणसे नव्हती आणि नरेंद्र मोदी विचारतात की यांनी काय केले? पाऊस आला तरी सभा घेणार- पवार शरद पवार म्हणाले, पंतप्रधानांनी पाऊस आला म्हणून म्हणून पुण्यातील सभा रद्द केली. पण आम्ही ठरवलं की पाऊस आला तरी सभा घ्यायची. विद्येचे, उद्योगाचे माहेरघर असलेल्या पुण्याचं सध्या वैशिष्ट्य काय तर कोयता गँग… पुण्याचं वैशिष्ट्य आधी काय होतं तर बजाजचा कारखाना , किर्लोस्करांचा कारखाना , विद्येचे माहेरघर आणि आज काय तर कोयता गँग, असं शरद पवार यांनी सांगितलं.