सेवेतून फुलवले रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य:रुग्णसेवा आमचे कर्तव्य आणि जबाबदारी समजून कार्यरत आहेत नवदुर्गा

रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे. रुग्णांची सेवा करणे ही आमची नोकरी असली तरी पहिले ते आमचे कर्तव्य आणि तेव्हढीच जबाबदारी आहे, याचे भान ठेवून आपल्या नोकरीच्या माध्यमातून रुग्ण सेवेतून रुग्णांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम करणाऱ्या आरोग्य सेवा क्षेत्राशी निगडीत शासकीय सेवेत असलेल्या महिलांशी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने साधलेला हा संवाद. ^गेल्या पंधरा वर्षांपासून एचआयव्ही, एड्स पॉझिटिव्ह रुग्णांचे समुपदेशन तसेच गुप्तरोग असणाऱ्यांना औषधोपचार करत आहेत. दरवर्षी किमान एक हजारांवर रुग्णांचे समुपदेशन केले. त्याची फलश्रुती म्हणून आत्महत्या करण्यापर्यंत मानसिकता झालेल्या अनेकांना त्यापासून परावृत्त केले. -माधुरी येळणे, लैंगिक संसर्गजन्य आजार समुपदेशक, जीएमसी. ^माझ्यासाठी रुग्णसेवा केवळ नोकरी नसून ते कर्तव्य आणि जबाबदारी आहे. क्षेत्रात २० वर्षांपासून कार्यरत आहे. योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. अकोल्यात सुपरस्पेशालिटीत रुग्ण सेवेचे उत्तम नियोजन केले. त्या कार्याची दखल घेत यंदाचा फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कार मिळाला. -सीमा सुळे, अधिपरिचारिका, सुपरस्पेशालिटी रुग्णालय. ^आशा वर्कर म्हणून गेली १० वर्षे काम करत आहे. माताबालसंगोपन, मुलींना मासिक पाळीविषयी मार्गदर्शन करत आहे. गरोदर महिलांच्या रात्री-बेरात्री होणाऱ्या बाळंतपणासाठी धावून जाते. एक-दोन महिलांची तर रस्त्यात ऑटो रिक्षातच डिलिव्हरी झाली.त्यांना मदत केली. – सविता प्रधान, आशा वर्कर, कपिलवस्तूनगर, शिवनी. ^नर्सिंग क्षेत्रात ३० वर्षांची सेवा झाली. स्टाफ नर्स म्हणून १९९५ मध्ये शासकीय सेवेत रुजू झाले. त्यानंतर रुगणसेवेबराबेरच स्पेशलायझेशन केले. इन्चार्ज म्हणून निवड झाली. गेली ११ वर्षे असिस्टंट मेट्रन म्हणून सर्वोपचार रुग्णालयात कार्यरत आहे. – प्रियंका जाधव, असिस्टंट मेट्रन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संचालित सर्वोपचार रुग्णालय. एचआयव्हीबाधितांची सेवा मासिकपाळीवर मार्गदर्शन ३० वर्षांपासून कार्यरत

Share

-