राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनावर जेसीबीतून पुष्पवृष्टी:राष्ट्रीय स्वयं संघाचे सर्वात जुने आणि महत्त्वाचे केंद्र

राष्ट्रीय स्वयं संघाचे सर्वात जुने आणि महत्त्वाचे केंद्र असलेल्या नेवासे येथे संघाच्या दसरा महोत्सवाच्या पथसंचलनावर शनिवारी दोन जेसीबीच्या साह्याने फुले उधळून व फटाके फोडून स्वागत करण्यात आले. पुढील वर्षी संघाचे शताब्दी वर्ष आहे. जिल्ह्यात नेवासे शहर हे संघाचे जुने केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वर मंदिर मार्गावर असलेल्या संघ कार्यालयापासून येथून सुरू झालेले हे संचलन नेवासे शहरातील जवळजवळ प्रत्येक प्रभागांमधून गेले प्रत्येक चौकात व मारुती मंदिर, राम मंदिर, मोहिनीराज मंदिर, गणपती मंदिर या चौकांत फुले उधळून संचलनातील स्वयंसेवकांचे स्वागत करण्यात आले गणपती चौकामध्ये दोन जेसीबी त्यांच्या साह्याने संचालनावर पुष्पवृष्टी करण्यात आली. प्रांत संयोजक सचिन राऊत आणि उदयकुमार बल्लाळ यांनी मार्गदर्शन केले.

Share

-