उद्धव ठाकरेंचा वचननामा जाहीर:मुलांना मुलींसारखेच मोफत शिक्षण देणार, मुंबईतील सागरी पुलाचे आश्वासन पूर्ण केल्याचा दावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गुरुवारी विधानसभा निवडणुकीचा आपला वचननामा जाहीर केला. मुलांना मुलींसारखेच मोफत शिक्षण देण्यासह कोळी बांधवांचा त्यांना हवा असणारा विकास, गृहनिर्माण धोरण ठरवणे, मुंबईसारखाच महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांतील झोपडपट्ट्यांचा विकास, मुंबईतील पळवलेले वित्तीय केंद्र नव्याने धारावीत उभारू अशी विविध आश्वासने ठाकरे गटाने या वचननाम्याद्वारे दिली आहेत. विशेषतः मुंबईकरांना सागरी पुलाचे दिलेले वचन पूर्ण केल्याचा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीचा आपल्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला. या जाहिरनाम्याद्वारे उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह महाराष्ट्राच्या सर्वांगिन विकासाचा शब्द देत कोळी बांधवांना त्यांना हवा असणारा विकास करण्याची ग्वाही दिली आहे. ठाकरे गटाचा हा जाहिरनामा पॉकेट साईज अर्थात खिशात मावणारा आहे. त्यावर एक क्यूआर कोड असून, तो स्कॅन केल्यानंतर मतदारांना तो आपल्या मोबाईलच्या स्क्रिनवर पाहता येणार आहे. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…

Share

-