“मानवसेवा’ला किराणा व भेटवस्तू:स्टेशन परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाचा उपक्रम

सोनेवाडी येथील अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळामार्फत मनोरुग्ण लोकांसाठी मानव सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून मनोरुग्णांची सेवा केली जाते. येथे ८० ते ८५ मनोरुग्ण आहेत. ५० ते ६० महिला म्हणून रुग्ण आहेत. यात बाहेर राज्यातील ही रुग्ण आहेत. या प्रकल्पास रेल्वे स्टेशन येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सामाजिक भावनेतून संघाचे अध्यक्ष के डी खानदेशे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य नानासाहेब दळवी व शामला साठे यांच्या हस्ते किराणा साहित्य व भेटवस्तू देण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. समाजापासून वंचित असलेल्या घटकांचा विचार करून त्यांना मदतीचा हात दिला जातो .वृद्धाश्रम असो दिव्यांग असो हे पण आपल्या समाजाचे घटक आहेत त्यांना आधाराची गरज आहे . समाजातील सर्व संस्थांनी मिळून सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या जीवनातील अंधार दूर करून प्रकाश देण्याचे कार्य करावे असे संघाचे अध्यक्ष के. डी .खानदेशे यांनी सांगितले. यावेळी संघाचे सदस्य नानासाहेब दळवी यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ दिवाळी भेट म्हणून केंद्रातील स्त्रियांना साड्यांचे वाटप करण्यात आले.

Share

-