बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला जीवे मारण्याची धमकी:मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या प्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधीही सलमान खानला लॉरेन्स गँगकडून अनेकदा धमक्या आल्या आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच आता शाहरुख खानला देखील धमक्या आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. सध्या या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईक गँगकडून सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत, तर दुसरीकडे आता शाहरुख खानलाही धमक्या आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा धमकीचा कॉल फैजान नावाच्या व्यक्तीने केला होता, जो रायपूरचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. फैजान नावाच्या व्यक्तीने शाहरुख खानला धमकीचा कॉल केला होता, त्याचा कॉल ट्रेस केला असता तो रायपूरचा असल्याचे निष्पन्न झाले. आता पोलिसांचे पथक रायपूरला रवाना झाले आहे. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल सलमान खाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. मोबाईलवर धमकी मिळाल्यानंतर शाहरुख खानच्या टीमने तक्रार दाखल केली आहे. तक्रार मिळताच मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ANI च्या वृत्तानुसार, भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम 308 (4), 351 (3) (4) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या क्रमांकावरून धमकी देण्यात आली आहे, तो क्रमांक छत्तीसगडमधील फैजान नावाच्या व्यक्तीच्या नावावर आहे. नंबर ट्रेस होताच मुंबई पोलिस रायपूरमध्ये पोहोचले. नाव सांगितले हिंदुस्थानी डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये एका अज्ञात कॉलरचा कॉल आला होता, ज्यामध्ये कॉलरने धमकी दिली होती की, मी बॅण्ड स्टँडचा मालक शाहरुख खानला मारून टाकीन. 50 लाख रुपये न दिल्यास जीवे मारेन, असे फोन करणाऱ्याने सांगितले. फोन करणाऱ्याला त्याचे नाव विचारले असता त्याने उत्तर दिले की, मला काही फरक पडत नाही, माझे नाव हिंदुस्थानी आहे. धमकी मिळाल्यानंतर शाहरुख खानचे घर मन्नत बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 2023 मध्येही आल्या होत्या धमक्या 2023 मध्ये पठाण आणि जवान या चित्रपटांच्या यशानंतर शाहरुख खानला सतत धमक्या येत होत्या. तक्रार नोंदवल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव त्याला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती. तेव्हापासून शाहरुख खान सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्थेत फिरतो.