पुस्तकाप्रमाणे भुजबळ काही बोलले नाही:त्यांनी त्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली; हा महत्त्वाचा मुद्दा नाही- अजित पवार

छगन भुजबळ यांनी स्वत:सांगितले की मी अशी काही मुलाखत दिली नाही, ज्यांनी हे छापले त्यांच्याविरोधात ते कोर्टात जाणार असे त्यांनी म्हटले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार म्हणाले की, जसा निवडणुकीचा दिवस जवळ येत आहे, तसे तसे महत्त्वाचे प्रश्न बाजूला करत काहीतरी नवीनच नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. हा काही निवडणुकीचा मुद्दा नाही. छगन भुजबळ हे जबाबदार नेते असून त्यांनी लगेच हे विधान आपण न केल्याचे स्पष्ट केले आहे. पुस्तकाचा मुद्दा महत्त्वाचा नाही अजित पवार म्हणाले की, हा मुद्दा आता महत्त्वाचा नाही, पुढील 5 वर्षे महाराष्ट्र कुणाच्या हाती द्यायचा हे महत्त्वाचे आहे. निवडणुकीचा मुद्दा सर्वांत जास्त महत्त्वाचा आहे. महायुतीत आमची विचारधारा वेगळी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आणि आमची विचारधारा देखील वेगळी होती, पण देशाच्या विकासासाठी आम्ही सोबत आलो आहोत. तर शाहु, फुले, आंबेडकर यांची विचारधारा मानतो. योगी आदित्यनाथ यांनी काय बोलावे याबद्दल आम्ही बोलणार नाही. कटेंगे तो बटेंगे अशा घोषणा महाराष्ट्रात चालणार नाही अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रात कटेंगे तो बटेंगे अशा घोषणा सहन होणार नाहीत. देशातील इतर राज्यात त्या पद्धतीन राजकारण जमत असेल पण ते महाराष्ट्रात चालणार नाही. राष्ट्रीय नेते हे जिल्ह्याच्या ठिकाणी सभा घेत असतात ते तालुक्याच्या ठिकाणी सभा घेत नाही, पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील जनता उपस्थित राहिल असे म्हणत बारामतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार नाही हे अजित पवारांनी स्पष्ट केले. महायुतींच्या नेत्यांनी माझ्याकडे येऊच नये अजित पवार म्हणाले की, मी महायुतीच्या नेत्यांना सांगितले आहे माझ्या बारामती मतदारसंघात प्रचार करण्यासाठी मी एकटा सक्षम आहे. उरलेल्या 287 मतदारसंघात आपण प्रचार करायला हवा, वेळी कमी आहे, तुम्ही माझ्याकडे येऊच नका असे मी महायुतीमधील नेत्यांना सांगितल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. प्रचारासाठी फारसा वेळ नाही अजित पवार म्‍हणाले की, प्रचारासाठी फारसा वेळच राहिलेला नाही. त्‍याचबरोबर निवडणूक खर्चाच्या मर्यादेमुळे मोठ्या सभा घेण्‍यावर मर्यादा येतात. मतदारसंघात फिरून आणि लोकांशी संवाद साधल्यानंतरच किती मतांनी विजय होईन हे मी सांगू शकेन; पण शंभर टक्के खात्रीने राज्‍यात महायुतील चांगले यश मिळेल.

Share

-