काँग्रेसने फक्त शिक्षण संस्था वाटल्या:विकासाला प्राधान्य दिले नाही, नितीन गडकरी यांची टीका
भाजप पक्ष हा मोदी किंवा गडकरींचा नाही,तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहेत.७५ वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेसने ग्रामीण भागातील विकास कामाला प्राधान्य दिले नाही, फक्त शिक्षण संस्था वाटप करण्याचे काम केले.त्यांच्या सोबतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोजगार हमी देत राहिले होते, त्यामुळे काँग्रेस पक्षावर अशी वेळ आली असल्याची खणखणीत टीका कारंजा घाडगे येथील जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. भाजपचे सुमित वानखेडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते,यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट,माजी खासदार रामदास तडस,दादाराव केचे,सुधीर दिवे,सरिता गाखरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.तर वर्धेच्या सभेत सागर मेघे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना गडकरी म्हणाले, रस्ते बनले त्यामुळे अमेरिकेचा विकास झाला आणि अमेरिका श्रीमंत झाली आहे.त्यामुळे देशात विकासाचे राजकारण झोले आहेत.जातिवादावर निवडणूक लढविणे ही आजची परिस्थिती नाही.आरक्षणाला विरोध नाही,जातिवादाचे विष पेरुन राजकारण केले जात आहेत. त्यांनी घराणेशाही जोपासली म्हणून आर्वी मतदार संघात खासदारांच्या पत्नीला उमेदवारी मिळाली आहेत.भाजप पक्ष हा मोदी गडकरींचा नसून सर्व साधारण कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे सर्वांना समान संधी उपलब्ध करुन दिली जात आहे. काँग्रेसने देशात ७५ वर्ष राज्य केले आहेत.ग्रामीण भागात कधीच विकासासाठी कामे केली नाही,फक्त काँग्रेस पक्षातील नेत्यांना शिक्षण संस्था वाटप करण्याचे काम केले. शिक्षण संस्था उभ्या राहिल्या तर त्या ठिकाणी शिक्षक नव्हते,दवाखाने उभे केले तर डॉक्टर नव्हते अशी परिस्थिती काँग्रेसने निर्माण केली होती. त्यांच्या विकासाला राष्ट्रवादी काँग्रेस हमी देत राहिले.ग्रामीण भागातील विकासाला कधीच महत्त्व दिले नाही,अशी खणखणीत टीका सुमित वानखेडे यांच्या कारंजा घाडगे येथील प्रचारार्थ जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
दादारावांनी विकासाचा ट्रेलर दाखविला आहेत,चित्रपट सुमित वानखेडे दाखविणार आहेत,असे भाष्य सुद्धा गडकरी यांनी केले. वर्धा,पुलगाव व समुद्रपूर येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांनी सभा घेतली आहेत.पुन्हा एकदा विकासाच्या बुलेट ट्रेनला भारत सरकारचे इंजिन आहेत दुसरं इंजिन महायुतीचे लावल्या गेल्याने विकासाची बुलेट ट्रेन सुसाट वेगाने धावणार आहेत.आत्मनिर्भर भारत बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता आणि जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था या देशाला बनविण्याचे जे स्वप्न आहेत ते मतदारांच्या आशीर्वादाने पुर्ण होणार आहेत,असे प्रतिपादन वर्ध्याच्या सभेत गडकरी यांनी केले. मंत्री रस्ते विकास विभागाचे अन् भाषणे कृषी संबंधीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जिल्ह्यात चार ठिकाणी सभेचा धडका होता.त्याप्रत्येक सभेत त्यांनी रस्ते विकास याविषयांवर भाषणे झाली. मात्र रस्ते विकास केंद्रीय मंत्री असताना,नितीन गडकरी यांनी कृषी संबधीत विषयी भाषणे केली.विदर्भातील शेतकरी समृद्ध करण्यासाठी आणि दुग्ध व्यवसायाला गती देण्यासाठी मदर डेअरी सुरु करण्यात आली आहे.प्रत्येक शेतकऱ्यांकडे पाच गाई असणे गरजेचे आहे.पशुमालकांना कमी भावात पशुखाद्य दिल्यास ४० हजार शेतकऱ्यांची गरिबी दूर होईल आणि शेतकरी कधीच आत्महत्या करणार नाही. शेतकरी आता अन्नदाता राहिला नसून,तो आता ऊर्जा दाता झाला आहेत.बघता बघता शेतकरी इंधन दाता सुद्धा होणार आहेत.प्रयोग केला तर नक्कीच शेतकऱ्यांची गरिबी दूर होईल.