शरद पवार आणि दाऊदची भेट झाली आहे:प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा, तपास करण्याची केली मागणी

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेट झालेली आहे, असा दावा त्यांनी केला आहे. या भेटीचा शोध घेतला पाहिजे. दाऊदचा शोध घेताना तिसऱ्या दिवशी दिल्लीत ब्लास्ट झाला. इसिसला माणसे पुरवण्याचे काम जगभरातून सुरू होते. 1900 ते 2000 या काळात देशात ब्लास्ट होत गेले. त्यामुळे शरद पवार आणि दाऊद यांच्या भेटीचा काही संबंध आहे का हे तपासले पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. सोलापूर शहर दुर्लक्षित आहे प्रकाश आंबेडकर म्हणाले, पुणे आणि सोलापूर या दोघांमध्ये साम्य आहे. दोघांनी सर्वात जास्त मंत्री पद भोगली आहेत. पण एक आणखी साम्य पाणी असून तहानलेले जिल्हे आहेत. सोलापूरला पाण्यासाठी 9 दिवस थांबवण्याची गरज नाही असे मी उमेदवार असताना म्हणले होते. 5 वर्ष झाले नवीन खासदार आले पण परिस्थिती तशीच आहे. दोष एकत्र लोकप्रतिनिधीमध्ये आहेत किंवा मतदारसंघात आहेत. सोलापूर शहर दुर्लक्षित आहे, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे गॅस सिलिंडर स्वीकारावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. धंदा वाढवायचा असेल तर भाजप प्रेम कमी करा शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवला तर लाडकी बहीण योजना सारख्या योजना आणण्याची गरज पडणार नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. टेक्स्टाईल उद्योगामुळे सोलापूरचे नाव जगाच्या पटलावर आहे. सोलापूरमध्ये टेक्स्टाईल कमिशन ऑफिस असायला हवे. सिंधी मारवाडी समाजाला माझे म्हणणे आहे की धंदा वाढवायचा असेल तर भाजप प्रेम कमी करा, असे देखील त्यांनी आवाहन केले आहे. पाच वर्षात भाजपने मुस्लिमांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ इच्छित असलेल्या उलमा यांनी 44 जागांची मागणी केली होती. त्यांना डबल डिजिट देखील जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे उलमा यांच्या या राजकारणाचा मुस्लिम समाजाला नेतृत्व मिळावे यासाठीचा दबाव कमी पडला का? मागच्या पाच वर्षात भाजपने मुस्लिमांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वांच्या पाठीशी वंचित आघाडी भक्कम राहील, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. अमित शहा यांना फेल केल्याशिवाय राहणार नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, अमित शहा यांचे चॅलेंज मुस्लिम समाजाने स्वीकारावे. उच्च न्यायालयाने शिक्षणतील पाच टक्के आरक्षण मान्य केले होते. आम्ही सत्तेत आल्यावर अमित शहा यांना फेल केल्याशिवाय राहणार नाही. या विधानसभा निवडणुकीत 200 मराठा आमदार निवडून जातील असे बोलले जात आहे त्यामुळे ओबीसी समाजाची भीती वाढत असल्याचे देखील आंबेडकरांनी सांगितले आहे.

Share

-