महाविकास आघाडीचे सरकार येणारच नाही:त्यांचा जाहीरनामा म्हणजे आमची कॉपीपेस्ट, सुधीर मुनगंटीवार यांची टीका

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापत असल्याचे दिसत आहे. राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. भाजप नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात येणार आता नाही, असे त्यांनी म्हणले आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, अर्ज मागे घेण्याची तारीख गेली असली तरीही महाविकास आघाडीने आता निवडणूक आयोगाला सर्व उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी पत्र देण्याची गरज आहे. तसेची आता महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात येणार नाही, अशी खोचक टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पाप केल्यावर कोविड होतो, त्यांच्या पक्ष प्रमुखांना सुद्धा कोविड झाला होता, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे. पुढे बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या जाहिरनाम्यावर देखील टीका केली आहे. महाविकास आघाडीकहा जाहीरनामा आमची नक्कल असल्याची टीका त्यांनी केली आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महाविकास आघाडीचा जाहीरनामा आमची नक्कल आहे. आमच्या कम्प्युटरमध्ये त्यांनी टाईप केलेला दिसत आहे. त्यांची कॉपी पेस्ट करायची सवय आहे. त्यांचा खोटारडेपणा खुर्चीत येऊन थांबतो. त्यांचे शिक्षक पश्चाताप करत असतील, त्यांना आम्ही चुकीचे शिकवले का? असा प्रश्न त्यांच्या शिक्षकांना पडत असेल. बटेंगे तो कटेंगे हे महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांनी म्हणले आहे. सर्व जाती व धर्मांनी एकत्र राहण्यास आम्ही सांगत आहोत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवर विश्वास आहे प्रेम आहे ते कॉंग्रेससोबत राहुच शकत नाही, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. भाजपच्या जाहीरनामामध्ये रयतेचे राज्य आणण्यासाठी महत्त्वाच्या बाबी अधोरेखित करण्यात आल्या आहेत, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. भाजपकडून अमित शहा यांच्या हस्ते संकल्प पत्र 2024 सादर करण्यात आला. शेतकऱ्यांना खतांमार्फत घेतलेला कर परत करण्याचा निर्णय घेणार आहोत. फक्त घोषणा नव्हे तर संकल्प पूर्ण करण्यासाठी पद्मविभूषण, पद्मश्री अशा लोकांची मदत घेतली जाईल. कॉंग्रेस काळात जाहीरनामा म्हणजे धूळ खात पडलेला कागद होता. आमचे संकल्प पत्र हे महाराष्ट्राचा 1 ट्रीलियन डॉलरच्या दिशेने जाणारी अर्थव्यवस्था असेल.

Share

-