मला हलक्यात घेतलं, आघाडी सरकार टांगा पलटी केलं- शिंदे:मुख्यमंत्र्यांच्या 29 मिनिटांच्या भाषणात मविआवर कडाडून टीका
मला हलक्यात घेतल्यानेच महाविकास आघाडीसरकारचा टांगा पलटी केला. लाडक्या बहिणींनालखपती झालेलं मला बघायचंय. लाडक्या बहिणींच्याविरोधात असलेल्या आघाडी सरकारला या बहिणीकडक लक्ष्मी बनून घरी बसवल्याशिवाय राहणारनाहीत. आता वारं फिरलंय.. आपलं महायुतीच ठरलंय,अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेवासेयेथील सभेत फटकेबाजी करताना सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा असल्याने कर्जमाफीचा निर्णय आम्ही घेतल्याचे सांगितले. नेवासेफाट्यावरील ज्ञानेश्वर कॉलेजजवळ महायुतीचेउमेदवार विठ्ठल लंघे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदेयांची सोमवारी (११ नोव्हेंबर) सभा झाली. प्रारंभीपालकमंत्री राधाकृष्ण विखे, उमेदवार लंघे, सचिनदेसरडा आदींची भाषणे झाली. मुख्यमंत्री शिंदे यांनीत्यांच्या २९ मिनिटांच्या भाषणात आघाडी सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, की काँग्रेसने खटाखट देणार असल्याचे सांगितले, पण त्यांचा खटका दबला नाही. मात्र, आम्ही पटापट दिले, कारण बोलतो तसे वागणारे आम्ही आहोत. राज्यात कोणीही उपाशीपोटीझोपू नये, हा आमचा मानस असल्याचे ते म्हणाले. लाडक्या बहिण योजनेबाबत खोटा प्रचार महाविकास आघाडीने लाडकीबहिण योजनेत खोडा घालण्याचेकाम केले. लाडक्या बहिणींच्याखात्यात आलेले पैसे लवकर काढा,अन्यथा हे पैसे परत जातील, असाखोटा प्रचार त्यांनी केला. मात्र,आम्ही महिलांना लखपती करणारअसून, आम्ही देणारे तर ते घेणारेआहेत. ते देवालाही सोडत नसल्याचेमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दादागिरी उखडून फेकू, शनैश्वर देवस्थानातील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान हे पवित्र स्थानआहे. शनिची वक्रदृष्टी पडली, तरी राजाचा रंक होतो.शनिदेव तालुक्यात परिवर्तन घडवल्याशिवाय राहणारनाही. शनैश्वरमधील भ्रष्टाचार खपवून घेतला जाणारनाही, अशी तंबी देत विकास आराखड्यातून संत ज्ञानेश्वरमंदिर व अहिल्यानगरचा विकास करणार असल्याचेसांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी नेवाशात भगव्याचा विजयहोणार आहे. पुंडलिक विजयाची वीट ठेवल्याशिवायराहणार नाही. तालुक्यातील घराणेशाही व दादागिरीउखडून फेकल्याशिवाय राहणार नसल्याचे ते म्हणाले.