दुरंगी लढतीत जातीय समीकरणच ठरणार प्रभावी:जरांगे फॅक्टर व ओबीसी मतदारांवरच ठरणार उमेदवारांचे भवितव्य
पैठणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे विलास भुमरेंविरोधी ठाकरे गटाचे दत्तात्रय गोर्डे अशी मुख्य लढत होत आहे. दोन्ही उमेदवार मराठा असून जरांगे यांच्या भूमिकेनंतर पैठणमधील मराठा मतदार कोणाच्या मागे राहणार ते महत्त्वाचे व निर्णायक ठरणार आहे. मराठा मतदार फिफ्टी-फिफ्टी होण्याची शक्यता असून यात मुस्लिम, ओबीसी मतदारांवर उमेदवाराचा विजय अवलंबून असणार आहे. पैठण विधानसभेसाठी एकूण १७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यात राष्ट्रीय समाज पक्षाने ओबीसी उमेदवार दिला व वंचितकडूनदेखील उमेदवार आहे. ओबीसीचे काही प्रमाणात जातीय समीकरण बघता कोणत्याही समाजाचे मतदान हे एकगठ्ठा राहील असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. मात्र सध्याची लढत बघता ठाकरे गटाचे दत्तात्रय गोर्डे व शिंदे गटाचे विलास भुमरे असाच सामना होणार आहे. मागील तीस वर्षांपासून शिवसेनेचे उमेदवार राहिलेले खासदार संदिपान भुमरे यांच्या मागे ओबीसी मतदार राहिला असला तरी यंदा त्याचे पुत्र उमेदवार असून ओबीसी भुमरे यांना पुन्हा साथ देणार की ओबीसी उमेदवार असलेले प्रकाश दिलवाले यांच्याबरोबर राहणार याची चर्चा सध्या होत आहे. विलास भुमरे यांची ओबीसी समाजातील कामे बघता ओबीसी शिंदे गटाबरोबर राहणार का हे बघणे महत्त्वाचे ठरेल. असे आहे पैठणमधील जातीय समीकरण मराठा १ लाख ५ हजार ओबीसी ९५ हजार मुस्लिम ६५ हजार दलित २६ हजार इतर ३० हजार . तृतीयपंथी —