कन्नडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेला सत्तार, अजित पवार गटाची दांडी:महायुतीत छुप्या बंडामुळे नेत्यांची धाकधूक वाढली
कन्नडला साेमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांची सभा झाली. या सभेत मुख्यमंत्र्यांचेनिकटवर्तीय समजले जाणारे पालकमंत्रीअब्दुल सत्तार आणि अजित पवार गटाचेपदाधिकारी गैरहजर होते. वैजापूर, जालना आणि घनसावंगीतही मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (११नोव्हेंबर) कन्नड शहरात आले होते. संजना जाधव यांना ऐनवेळी शिंदे गटात प्रवेश दिला. लगेच दुसऱ्या दिवशी शिंदेसेनेकडून उमेदवारी दिल्याने कन्नडमधील महायुतीत तिन्ही पक्षांच्या तीन ते चार इच्छुकांसह पालकमंत्री अब्दुल सत्तार नाराज आहेत.त्यामुळे त्यांनी सभेकडे पाठ फिरवली. वैजापूर | मागील निवडणुकीत आमदारबोरनारे यांच्याविरुद्ध लढणारे भाऊसाहेबपाटील चिकटगावकर अभय पाटील ,राजीव डोंगरे, संतोष जाधव , एल . एम.पवार, संजय निकम हे पाच उमेदवार आजआपल्या बाजूने आहेत. माजी आमदार भाऊसाहेब यांच्या नावाचा उल्लेख करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अनुभव त्यांनाआला आहे. त्या पक्षाला फक्त माल म्हणजेपैसे देणारा सक्षम उमेदवार हवा असतो,अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव नघेता वैजापुरात केली. महाविकासआघाडीचे नेते सत्तेवर असताना ते घरातचबसले व समृध्दी महामार्ग, वॉटरग्रीड,मंंुबईमेट्रो अशा योजनांना ब्रेक लावले, अशीटीका मुख्यमंत्र्यांनी जालन्यात केली. घनसावंगीत माजी मंत्री राजेशटोपेंवर सोडले टीकेचे बाण घनसावंगी मतदारसंघात २५ वर्षे एकाचव्यक्तीकडे सत्ता दिल्याने विकासाच्या नावानेबोंबाबोंब झाली आहे. त्यांनी स्वतःच्याशाळा, कारखाने, सूतगिरण्या यांचाचविकास केला. सर्व सामान्य जनतेच्यामूलभूत गरजा तसेच रस्ते आणि पाणी यामुख्य कामांकडे दुुर्लक्ष केले, अशी टीकामुख्यमंत्र्यांनी माजी मंत्री राजेश टोपेंवर केली. चाळीसगाव घाटातील बोगद्याचेकाम मार्गी लावण्याची ग्वाही बोगदे आणि रस्त्यांच्या कामात मी पटाईतआहे. त्यामुळे कन्नड घाटातील बोगद्याचेकाम मार्गी लावले जाईल, असे आश्वासनयावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. लाडक्याबहीणींचे मानधन १५०० वरून २१०० रुपयेकेले जाईल,लाडकी बहीण प्रवास करायलालागली आणि एसटी नफ्यात आली, असेमुख्यमंत्र्यांनी सांगितले. सत्तारांची नाराजी का? लोकसभा निवडणुकीपासून पालकमंत्रीसत्तार आणि माजी केंद्रीय मंत्रीरावसाहेब दानवे हे एकमेकांवरआरोप-प्रत्यारोप करत आहेत. एका नेत्याने आरोप केला की लगेच त्याला दुसऱ्याकडून प्रत्युत्तर दिले जाते. कन्नड मतदारसंघाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री सत्तार यांच्याकडे दिली होती. मात्र, ऐनवेळी रावसाहेब दानवे यांच्याकन्या संजना जाधव यांनी पक्षप्रवेशकरून उमेदवारी मिळवली. त्यामुळेपालकमंत्र्यांनी उमेदवारीचा शब्द दिलेलेपदाधिकारी नाराज झाले. कट्टर विरोधकरावसाहेब दानवे यांच्या कन्येसाठीमतदारसंघात काम कसे करावे, असाप्रश्न सत्तारांसमोर निर्माण झाला. त्यामुळेत्यांनी सोमवारी झालेल्या सभेपासूनअंतर राखणे पसंत केले. त्यांच्याभूमिकेकडे लक्ष लागले आहे.