दिव्य मराठी अपडेट्स:नरेंद्र मोदींची आज सोलापूर-पुण्यात, तर राहुल गांधींची चिखली – गोंदिया मध्ये जाहीर सभा
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स मोदींची आज सोलापूर-पुण्यात, तर राहुल गांधींची चिखली-गोंदियात जाहीर सभा मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता सोलापूर आणि सायंकाळी 6 वाजता पुणे येथे जाहीर सभा होणार आहे. राहुल गांधी 12 नोव्हेंबरला सकाळी 11.30 वाजता चिकलठाणा विमानतळावरून चिखलीला जातील. तेथे 12 वाजता आणि दुपारी 3.30 वाजता गोंदियात सभा घेऊन ते दिल्लीला रवाना होतील. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोहारा, धाराशिव शहरात आज सभा
लोहारा – महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मंगळवारी (दि.12) उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी 1 वाजता, तर धाराशिव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ सायंकाळी 6 वाजता कन्या प्रशाला मैदानावर सभा होणार आहे. गडकरी यांची आज देवणीत होणार सभा निलंगा – केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीनगडकरी यांची आजमंगळवारी (12 नोव्हेंबर)सकाळी देवणी येथे सभाहोणार आहे. निलंगामतदारसंघातील भाजपामहायुतीचे उमेदवारआमदार संभाजीरावपाटील निलंगेकर यांच्याप्रचारासाठी ते सभाघेतील, अशी माहितीभाजपा प्रदेश सचिवअरविंद पाटील निलंगेकरयांनी दिली. देवणी येथीलबसस्थानकासमोरधोंडीराम पाटील मैदानातसकाळी 10.30 वाजता हीसभा होईल. भाजपामहायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी उपस्थितरहावे, असे आवाहनकरण्यात आले आहे. सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांची चौकशी थांबवली नाही; भाजप नेते प्रकाश जावडेकर यांचा सांगलीत दावा सांगली – सिंचन घोटाळ्यातील 72 हजर कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात सुरू असलेली चौकशी थांबवण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच अजित पवार हे त्यांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत. या पक्षाशी भाजपने केवळ महायुती केली आहे, असेही ते म्हणाले. मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे नाव घेत सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर ते शिंदे सरकारमध्ये कसे सहभागी झाले, असे विचारता जावडेकर यांनी अजित पवार यांचा पक्ष स्वतंत्र आहे. त्या पक्षाशी आम्ही युती केली आहे. यात काहीही गैर नाही, असेही जावडेकर म्हणाले. घुसखोर फातिमाला आजन्यायालयात हजर करणार बदनापूर – भारताच्या चोरट्या मार्गाने घुसखोरीकरणाऱ्या फातिमा (नाव बदलले)या तरुणीला बदनापूर पोलिसांनीपकडले होते. दोन वर्षांपासून हीतरुणी मुंबईत राहत होती.बांगलादेशातून ज्या तीन जणांनीआणले, त्या तिघांना ताब्यातघेण्यासाठी फातिमाला सोबत घेऊनबदनापूर ठाण्याचे पोलिस गेले होते.परंतु, ते तिघेही न सापडले नसल्यानेपोलिसांना रिकाम्या हाताने परत यावेलागले. पोलिस कोठडी संपल्यामुळेमंगळवारी पुन्हा फातिमा हिलान्यायालयात हजर केले जाणारअसल्याची माहिती पोलिस सूत्रांनीदिली. बांगलादेशातून भारतात प्रवेशकरणाऱ्या तरुणीचे शेगावकडीलएका तरुणाशी सूत जुळले होते. यातरुणीने त्या तरुणालाही तिचे नावबनावट सांगून फसवणूक केली. तळोद्यामध्ये 16 एकर ऊस जळून खाक जळगाव – तालुक्यातील मोहिदा व उमरी शिवारात संध्याकाळच्या सुमारास वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 28 एकर उसाला आग लागली. त्यापैकी 16 एकर ऊस जळून खाक झाला. शेतमालक व गावातील शेतकरी आग विझविण्यासाठी गेले असता काही प्रमाणात पीक बचावले. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. मागील काही वर्षांपासून पपई माल तयार झाला आणि काढणीला आला की पपई कापून फेकून देणे उसाला आग लावणे असे प्रकार वाढले आहेत. तळोदा तालुक्यात भरपूर पाणी असल्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. नरहर शरद चव्हाण यांचा सुमारे 14 एकर व रविवारी नीता ज्ञानेश्वर चित्ते यांचा 2 एकर ऊस जळाल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. पुणे जिल्ह्यात आचारसंहिता कालावधीत तब्बल 31 कोटींचा मुद्देमाल केला जप्त पुणे – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान 15 ऑक्टोबरपासून जिल्ह्यात 31 कोटी 77 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. यात 10 कोटी 92 लाख 25 हजार रुपये रोकड, 5 कोटी 2 लाख 57 हजार रुपयांचे 6 लाख 5 हजार लिटर मद्य, 58 लाख 81 हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ, 8 कोटी 63 लाख 53 हजार रुपयांचे मौल्यवान धातू, 6 कोटी 59 लाख 88 हजारांच्या वस्तूंचा समावेश आहे. आणखी काही दिवस स्थिर पथके महामार्गावर ही कारवाई सुरूच ठेवणार आहे. मुकेश अंबानी प्रकरणातील सेबीचे अपील फेटाळले नवी दिल्ली – रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याशी संबंधित प्रकरणात सिक्युरिटीज अपीलीय न्यायाधिकरणाच्या (सॅट) आदेशाविरुद्धची सेबीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. वास्तविक, नोव्हेंबर 2007 मध्ये रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडच्या शेअर्समध्ये कथित हेराफेरीशी संबंधित प्रकरणात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) अंबानी व इतर दोन पक्षांना दंड ठोठावला होता. तो सॅटने फेटाळा होता. याविरोधात सेबीने सुप्रीम कोर्टात अपील केले होते. न्या. जे. बी. पारडीवाला व न्या. आर. महादेवन यांचे खंडपीठ म्हणाले, आम्हाला सॅटच्या आदेशात हस्तक्षेप करायचा नाही. मुंबईत 7 तुकड्यांत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला मुंबई – मुंबईतील गोराई बीचवर एका अज्ञात व्यक्तीचा सात तुकडे केलेला मृतदेह एका गोणीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीच्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी स्थानिक पोलिसांनी नुकत्याच मृत व्यक्तीच्या वर्णनाशी जुळणारी कोणतीही हरवलेली व्यक्ती तक्रार दाखल केली आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी जवळच्या पोलिस ठाण्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जंगलासारख्या निर्जन भागात एक गोणी सापडली. गोणीतून दुर्गंधी येत असल्याचे स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी गोणी उघडली असता त्यांना 4 प्लास्टिकच्या बॉक्समध्ये एका व्यक्तीच्या विकृत शरीराचे तुकडे आढळले. मृतदेहाचे अवयव पोस्टमॉर्टेमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृताचे वय 25 ते 40 वर्षे आहे. त्याच्या उजव्या हातावर ‘आरए.’ लिहिलेला टॅटूही होता. सॅनिटायझर हे कीटकनाशक असल्याचा केंद्राचा आदेश रद्द मुंबई – हँड सॅनिटायझरचे वर्गीकरण कीटकनाशक असे करणारे केंद्र सरकारचे सन 2020 मधील प्रसिद्धी पत्रक मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले अाहे. यावर 18 टक्के जीएसटी अाकारण्यात येणार होता. यासंबंधीचा निर्णय घेण्याचा अधिकार न्यायपालिका अथवा निम न्यायिक प्राधिकरणाच्या कक्षेत येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले अाहे. न्या.एम.एस.सोनक आणि न्या.जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. अल्कोहोलवर अाधारित सर्व हँडसॅनिटायझरचे वर्गीकरण कीटकनाशकात करा असे अादेश अर्थमंत्रालयाने प्राधिकरणाला दिले होते. अयोध्येत राम मंदिर परिसरात हल्ल्याची धमकी नवी दिल्ली – खलिस्तानी दहशतवादी व शीख फॉर जस्टिस (एसएफजे) प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने अयोध्येतील श्रीराम मंदिर परिसरात 16 आणि 17 नोव्हें रोजी हल्ला करण्याची धमकी दिली आहे. हिंदुत्व विचारसरणीची जन्मभूमी असलेल्या अयोध्येचा पाया आम्ही हादरवून टाकू, असे पन्नूने आपल्या धमकीच्या संदेशात म्हटले आहे. या संदर्भातील ऑडिओ संदेश मिळाल्यानंतर पोलिस आणि प्रशासन अलर्ट झाले आहे. अयोध्या परिक्षेत्राचे महानिरीक्षक प्रवीण कुमार म्हणाले, अयोध्ये भाेवती आधीपासूनच कडकोट सुरक्षा व्यवस्था आहे. पोलिस आणि निम लष्करी दल 24 तास जागता पहारा देत असून कोणत्याही दहशतवादी हल्ल्यास तोंड देण्यास समर्थ आहेत. पन्नूच्या व्हायरल होणाऱ्या धमकीची सत्यता पडताळून पाहिली जात आहे.असे प्रवीणकुमार यांनी सांगितले.