वैष्णवांच्या आगमनाने गजबजली पंढरी:कार्तिकीसाठी 3 लाख वारकऱ्यांचा मेळा, दर्शनरांगेत 1 लाखाहून अधिक भाविक, भक्ती निवास, मठ हाऊसफुल्ल

कार्तिकी एकादशीसाठी पंढरीत तीन लाखांहून अधिक भाविक दाखल झालेले आहेत. निवडणूक आचारसंहितेमुळे पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पलकुंडवार यांच्या हस्ते शासकीय महापूजा होत आहे. कार्तिकी साठी शेकडो दिंड्या आणि पालख्या पंढरपुरात दाखल झालेल्या आहेत. राज्यभरातून आलेल्या वैष्णवांमुळे पंढरी भाविकांनी दुमदुमली आहे. मंदिरापासून सुमारे चार किमी अंतरावर दर्शन रांग पोहोचली आहे. दर्शन रांगेत १ लाखाहून अधिक भाविक दाखल झालेले आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ३०० कॅमेरे लावलेत. आज पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेकरीता एसटी, रेल्वे, खासगी वाहनांची तसेच दिंड्यांबरोबर लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. दशमी दिवशी चंद्रभागा वाळवंट, ६५ एकर, मंदिर परिसर, स्टेशन रोड, भक्तीमार्ग, प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी फुलून गेला आहे. दर्शन रांग मंदिरापासून पत्राशेडमधील दशमी दिवशी सायंकाळी ६ वाजता ७ व्या दर्शन शेडमध्ये पोहोचली आहे. पुढे दर्शन रांग गोपाळपूर पर्यंत उभारली आहे. मंदिरापासून सुमारे चार किमी अंतरावर दर्शन रांग पोहोचली आहे. दर्शन रांगेत १ लाखाहून अधिक भाविक दाखल झालेले आहेत. तर ६५ एकर भक्तीसागरात दोन लाखांहून अधिक भाविक वास्तव्य करत आहेत. विधानसभा निवडणुकीमुळे वारकऱ्यांची संख्या कमी झाली असल्याची दिसतेय विधानसभेची निवडणूक ऐन भरात आली आहे. येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. मात्र प्रचार आणि मोठ-मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभांचे आयोजन गावोगावी होत असल्याने त्या-त्या भागातील राजकारणात सक्रिय असलेले लोक कार्तिकी वारीला येताना दिसून येत नाहीत. त्यामुळे काही अंशी यंदाच्या कार्तिकी वारीमध्ये वारकऱ्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत असल्याची चर्चा सुरू आहे. भाविकांच्या उपस्थितीने शहरातील व उपनगरातील मठ, मंदिर, भक्त निवास हाऊस फुल्ल झाली आहे. नदी पात्रात अनूचित प्रकार घडू नयेत म्हणून जीवरक्षक दलाच्या स्पीड बोटी तैनात करण्यात आलेल्या आहेत. १ हजार ६२५ पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. तर ३०० हून अधिक सीसीटिव्ही कॅमे-यांची करडी नजर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आहे. रेडिओ, टीव्हीवर पूर्वी जाहिराती या स्लोगन, नेत्यांचे आवाहन याच्या असायच्या. पण आता कार्टुन स्वरूपात नेत्यांना सामान्य नागरिकांद्वारे प्रश्न विचारून निरूत्तर केल्याच्या क्लिप, नाट्यछटांद्वारे अधिक प्रचार केला जात आहे. पंढरीतील सर्व भक्तीनिवास हाऊसफुल्ल रांगेतील भाविकांना पदस्पर्श दर्शनाला किमान ८ ते १० तासाचा कालावधी राज्यभरात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकी मुळे यंदा भाविकांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी झाल्याचे दिसत आहे. दर्शन रांगेतील भाविकांना पदस्पर्श दर्शनासाठी किमान ८ ते १० तासाचा कालावधी लगात आहे. एका मिनीटाला साधारणपणे ३५ भाविकांना पदस्पर्श दर्शन मिळत आहे. मुख दर्शन रांगही मंदिरापासून विठ्ठल अन्नक्षेत्रापासून पुढे संभाजी महाराज पुतळा ते काळा मारुती पर्यंत दर्शन रांग पुढे सरकली आहे.

Share

-