35 टक्क्यांहून अधिक सोयाबीनची विक्री:भाव अजूनही 4 हजारांवरच

जिल्ह्यातील खरिपाचे मुख्य पीक सोयाबीन आहे. दरवर्षी जिल्ह्यात जवळपास १२ ते १४ लाख पोत्यांचे उत्पादन होते. यंदा मात्र अवेळी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना जबर फटका बसला असून सोयाबीनचे सरासरी उत्पादन ४० ते ५० टक्क्यांनी घटले आहे. त्यावरून शेतकऱ्यांनी आतापर्यंत जवळपास ३५ टक्क्यांहून अधिक सोयाबीन बाजारात विकले आहे, परंतु भावात अजूनही वाढ झाली नाही. एपीएमसीमध्ये सोमवारी येथील शेतकऱ्यांना सोयाबीनला प्रतिक्विंटल ३८५० ते ४१९६ रुपये भाव मिळाला. यंदा सोयाबीन विक्रीला आल्यापासून हाच भाव आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील सव्वा महिन्यात सुमारे सव्वादोन लाख पोत्यांची विक्री झाली (यंदाच्या एकूण उत्पादनाच्या ३५ टक्के) आहे, मात्र अजूनही भाव जैसे थेच आहे. सोयाबीन हे शेतकऱ्याचे मुख्य पीक आहे. सोयाबीनवरच शेतकऱ्याचे वर्षभराचे अर्थचक्र अवलंबून आहे. जो भाव शेतकऱ्यांना आज मिळतोय, तोच {उर्वरित. पान ४ लागवडीचा खर्चही निघेना; शेतकरी झाले हवालदिल अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज सोयाबीनची १५ हजार पोत्यांच्या आसपास आवक आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून वाढलेली आवक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अधिक राहते. याच काळात शेतकऱ्यांना समाधानकारक भाव अपेक्षित राहतो. मात्र खासगी बाजारात मिळणारा दर व उत्पादन पाहता अनेक शेतकऱ्यांना नफा तर झाला नाही उलट जितकी रक्कम लागली ती सुद्धा वसूल झाली नाही.

Share

-