उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘बाण’ निघून गेला, आता फक्त ‘खान’ उरला:मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
विधानसभा निवडणुकीदरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वर्सोवा विधानसभा मतदारसंघात हारून खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता ठाकरे गटाच्या या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत केवळ खान राहिले आहेत, अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची दिंडोशी मालाड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या मतदारसंघातील मनसेचे उमेदवार भास्कर परब यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांनी उर्दूमध्ये पत्र काढले आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी निशाणा साधला. मराठवाड्यामध्ये ‘खान हवा की बाण हवा’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याकडून बाण निघून गेला आहे तर फक्त खान उरला आहे, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाचा उमेदवार हारून खान यांच्या नावातच ‘हरू’ आहे. त्यामुळे तो कसा जिंकणार? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांच्यावरही टीका दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर गेल्या 14 ते 15 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना दीपोत्सव साजरा करते. मात्र अचानकपणे तेथील लाईट बंद करण्यात आले आहेत, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवाजी पार्कवर 14 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे. त्यामुळे ते लाईट काढून टाकले आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. याआधी हिंदूंच्या सणावर बंदी आणली होती, त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे आली असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. यावेळी राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली. राहुल गांधी यांच्या डोक्यात दिवा पेटत नाही तर उद्धव ठाकरे यांचा लाईट कमी लागतो, अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव गटावर निशाणा साधला. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. राम मंदिर निर्माणातील मोदींचा ‘राजकीय इंटरेस्ट’ संपला:त्यामुळे भाजपने देव फिरवला; रामाचा नवा वनवास सुरू झाला आहे काय? ठाकरे गटाचा निशाणा राममंदिराचे राजकारणच चालत नाही म्हटल्यावर मोदी–शहांच्या तोंडून रामनाम येणेही बंद झाले. लोकसभा निकालानंतर मोदी एकदाही अयोध्येत गेले नाहीत. राम मंदिर निर्माणातील मोदींचा ‘राजकीय इंटरेस्ट’ संपल्याचा परिणाम असा झाला की, राममंदिराचे काम रखडून पडले. मोदी साहेबांनी देव बदलला. त्यामुळे भाजपने देव फिरवला. श्रीराम पुन्हा वनवासी होतात की काय, अशी भीती त्यामुळे निर्माण झाली. रामाची निवास व्यवस्था अपुरी आहे. रामाचे छत गळते आहे व घराला कुंपण नाही. दरबाराचे कामही अपूर्ण. त्यामुळे रामाची अवस्था अवघडल्यासारखी झाली. दिल्लीच्या राजाने देव बदलल्याचा फटका अयोध्येच्या राजाला बसला. भाजपला आता श्रीराम नकोसे झाले! रामाचा नवा वनवास सुरू झाला आहे काय? असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. या बाबत ठाकरे गटाने दैनिक सामनाच्या माध्यमातून भाजपवर आणि मोदींवर निशाणा साधला. पूर्ण बातमी वाचा…