भाजपने कार्यकर्त्याचा सन्मान ठेवला नाही:त्यामुळेच अशा लाथा मारल्या जातात, आदित्य ठाकरेंचा रावसाहेब दानवेंवर हल्लाबोल

गेल्या दोन वर्षात भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राहिलेला नाही.जुन्या कार्यकर्त्यांना काहीही मिळाले नाही.रावसाहेब दानवे कार्यकर्त्यांना लाथ मारून त्यांचा सन्मान ठेवलेला नाही याचा विचार आता सर्वांनी करावा असे मत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.ते छत्रपती संभाजी नगर मध्ये विमानतळ वर आल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.आदित्य ठाकरे हे बीड जिल्ह्यात सभा घेण्यासाठी निघाले असताना त्यांनी विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यात सध्या महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे.त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. हलके होते म्हणून वाहत गेले एकनाथ शिंदे यांनी मला हलक्यात घेऊ नका. मला हलक्या घेतले तर मी सरकार पाडल्याची टीका केली होती त्याला प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, हलके होते म्हणूनच वाहत वाहत सुरत गुवाहाटी ला गेले. मात्र त्यांनी गद्दारी करून सरकार पाडल्याचं त्यांनी कबूल केले. मात्र हे ते बोलत आहेत का पाठीमागून टेली प्रॉम्प्टर आहे का ते पाहावे लागणार आहे अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्या प्रकरणात आता सर्वच लोकांच्या बॅग तपासल्या पाहिजेत. शिंदे यांची बॅग कधी तपासली जाते का असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. भाजपच्या हिंदुत्वावर विश्वास कसा ठेवायचा फडणवीस यांनी छत्रपती संभाजी नगर मध्ये धर्मयुद्ध करण्याचे आवाहन केले होते याबाबत विचारले असता ठाकरे म्हणाले की निवडणुकीसाठी यांनी राम मंदिरांचे बांधकाम पूर्ण व्हायच्या अगोदर उद्घाटन केले बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात अत्याचार होत असताना जय शहा क्रिकेट खेळायला बांगलादेशात गेले होते मग यांच्या हिंदुत्वावर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल त्यांनी यावेळी केला.

Share

-