बियाणींचा मर्डर कोणी केला? खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल:अन्यथा करुणा मुंडेंना सांगायला लावेल, आव्हाडांचा धनंजय मुंडेंना इशारा
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिकच्या सभेत बोलताना जोरदार हल्लाबोल केला होता. जातीपातीचे राजकारण कोण करत आहे, असा प्रश्न उपस्थित करत नाव न घेता त्यांनी शरद पवारांवर टीका केली, तर जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली, असा आरोपही त्यांनी केला आहे. यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार केला आहे. डॉ. बियाणी यांचा मर्डर कोणी केला? खऱ्या बापाचा पोरगा असेल तर उत्तर देईल, असे म्हणत आव्हाड यांनी हल्लाबोल केला आहे. खऱ्या बापाचा पोरगा असेल तर याचे उत्तर देईल
जितेंद्र आव्हाड म्हणाले, धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोळायकह झाले तर मी खूप काही बोलू शकतो, त्याला फक्त माझा एकच प्रश्न विचारा, बियाणीचा मर्डर कोणी केला? त्याच्यामागचे कारण काय होते. हिम्मत असेल आणि खऱ्या बापाचा पोरगा असेल तर याचे उत्तर देईल. नाही तर आमच्या एक भगिनी आहेत करुणा मुंडे नावाच्या, त्यांना बाजूला मी घेऊन बसतो आणि त्यांना सांगायला लावतो. जो खुद शीशो के घरो मे रहते हे, वो दुसरो के घरो पर पत्थर नही मारा करते, असे म्हणत आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे. धनंजय मुंडे कोण आहे?
पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवार साहेबांनी सांगितले होते तुझी किती लफडी होती आणि कसे बाहेर काढले. आणि तुम्ही म्हणता माझ्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शरद पवारांचे नुकसान झाले, घर फोडले, मग एकदा शरद पवारांना जाऊन विचारा. साहेब जर असे सांगत असतील तर मी म्हणेल, हो मी तसे केले. धनंजय मुंडेने कशाला सांगायला हवे, हे शरद पवारांच्या तोंडून येऊ द्या. धनंजय मुंडे कोण आहे? धनंजय मुंडे म्हणजे अजित पवारांचाच भाऊ
जितेंद्र आव्हाड म्हणाले, धनंजय मुंडे शरद पवार यांच्यावर काय बोलणार, शरद पवारांनी फक्त ‘आ’ केले तर हा घरात जाऊन बसेल. पण आमचे साहेब बोलत नाहीत, तोच आमचा प्रॉब्लेम आहे, साहेब कधीच कोणाबद्दल बोलू इच्छित नसतात. धनंजय मुंडे म्हणजे अजित पवारांचाच भाऊ आहे. काकांच्या पाठीत सुरा खुपसणारा. स्वतःच्या बहिणीला छळ छळ छळणारा, आता गोडवे गातोय. पूर्वी काय केले ते मला विचारा, मी सांगतो. पुढे ते म्हणाले, मी एवढेच सांगतो की माझे तोंड खूप घाणेरडे आहे, मी जो प्रश्न केला आहे तो उभ्या महाराष्ट्राने त्याला करावा की, डॉ. बियाणी यांचा मर्डर कोणी केला.