महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक:माजी आमदाराच्या मुलाला मार लागल्याने गंभीर जखमी; तक्रार दाखल

जालना जिल्ह्यातील भोकरदन विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आली आहे. दोन्ही दानवेंमध्ये चांगलीच अटीतटीची लढत येथे होत असून काल रात्री आठ ते नऊ वाजे दरम्यान दगडवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत दानवे हे गावातील प्रचार सभा आटोपून आपल्या सोबतच्या स्थानिक कार्यकर्त्यांसोबत गाड्यांचा ताफा घेऊन निघाले असता दगडवाडी भोकरदन रस्त्यावर शाळेच्या समोर अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. यात सुदैवाने उमेदवार चंद्रकांत दानवे यांची गाडी पुढे निघून गेली होती. मात्र, त्यांच्या पाठीमागील असलेल्या गाडीत त्यांचे कार्यकर्ते तसेच भोकरदनचे माजी आमदार संतोष दसपुते यांचे पुत्र राजेंद्र दशपुते हे होते. त्या दगडफेकी मध्ये एक दगड राजेंद्र दसपुते यांच्या खांद्याला लागून ते जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच लगेच सर्वांनी रात्रीच भोकरदन येथे पोलिस ठाण्यात येऊन आमदार चंद्रकांत दानवे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. भोकरदनचे पोलिस या घटनेचा व दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्याचा शोध घेत आहेत. निवडणुकीला गालबोट लागले भोकरदन विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पारंपारिक प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार संतोष दानवे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्यात तिसऱ्यांदा लढत होत आहे. ही निवडणूक अटीतटीची होत असून दोन्ही दानवे जोरदार प्रचार अभियान राबवत आहे. त्यातच दगडवाडी येथील दगडफेकीच्या घटनेमुळे या निवडणुकीला थोडे गालबोट लागलेले आहे. शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक आता मुद्द्यावरून गुद्यावर आलेली दिसत आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील 1 लाख बुथ प्रमुखांशी संवाद साधणार:भाजपकडून ‘माझा बुथ, सर्वात मजबूत’ अभियान भारतीय जनता पार्टीनं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘माझा बुथ, सर्वात मजबूत’ या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील जवळपास १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. हा विशेष संवाद नमो ॲपच्या माध्यमातून व ऑनलाइन पद्धतीनं साधला जाईल. येत्या १६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. पूर्ण बातमी वाचा… भाजपने प्रचाराचा स्तर पार नासवून टाकला:सत्ताधारी महागाईचा ‘म’ म्हणायलाही तयार नाहीत; उद्धव ठाकरे गटाची टीका महागाईविरुद्ध बोंबा ठोकून सत्तेत आलेले राज्यकर्ते आज महागाईचा ‘म’ म्हणायलाही तयार नाहीत. महागाईऐवजी हिंदू, मुसलमान, निजाम, औरंगजेब, ‘बटेंगे ते कटेंगे’, ‘एक रहो, सेफ रहो’ अशा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घोषणा व उन्मादी विषय निवडणुकीत आणून भाजपने प्रचाराचा स्तर पार नासवून टाकला आहे. प्रचारासाठी गावात किंवा दारात येणाऱ्या सत्तारूढ पक्षाच्या नेत्यांना आता मतदारांनीच खडसावून सांगितले पाहिजे, ‘हिंदू–मुसलमान आम्ही बघून घेऊ, तुम्ही महागाई कधी कमी करणार ते बोला!’असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने भाजपवर हल्लाबोल केला. त्यांनी सामनाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नावर निवडणुकीला सामोर जाण्याचे आवाहन केले आहे. पूर्ण बातमी वाचा…

Share

-