कारखाने विकत घ्यायला आम्ही महाराष्ट्रभर हिंडलो नाही:जयंत पाटलांचा अजित पवारांच्या आरोपावर प्रत्युत्तर

खानापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना जयंत पाटलांनी अजित पवारांवर टीका केली आहे. कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, असे म्हणत जयंत पाटलांनी अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. संभाजी पवारांचा कारखाना जयंत पाटलांनी विकत घेतला, असा आरोप अजित पवारांनी केला होता. आष्टा येथील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजी पवारांचा कारखाना जयंत पाटलांनी विकत घेतला असा आरोप केला होता. यावर जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही किंवा आमचे कारखाने बळकवण्याचीही भूमिका नाही. राजाराम बापू साखर कारखाना हा काय माझा खासगी कारखाना नाही. तर तो सहकारी साखर कारखाना आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, धुराडं पेटवणार म्हणजे काय? आम्ही साखर कारखाने सुरु व्हावेत ही आमची भूमिका आहे. साखर कारखाने बळकावण्याची आमची भूमिका नाही. आष्टामध्ये एका नेत्याने सांगितले की संभाजी पवार यांचा कारखाना जयंत पाटील यांनी घेतला. संभाजी पाटील यांनी डोळ्यातून अश्रू काढले, हा कारखाना तुमच्याकडे घ्या म्हणाल्याचे जयंत पाटील म्हणाले. मी यावेळी बँकांना बोलावले, वन टाईम सेटलमेंट केले, 70 75 कोटी रुपये होते. राजारमबापू कारखान्याने ते पैसे भरले, त्यातून कारखाना सोडवल्याचे जयंत पाटील म्हणाले. पुढे जयंत पाटलांनी सांगितले, पाच वर्ष आम्ही कारखाना चालवू, शेवटच्या दोन वर्षात त्यांनी पैसे द्यावेत आणि त्यांनी साखर कारखाना ही प्रक्रिया होती. ही प्रक्रिया त्यांनी केली नाही. त्यामुळ राजारामबारू हा कारखाना माझा खासगी कारखाना नसल्याचे जयंत पाटील म्हणाले. आम्ही सहकारातील लोक आहोत. सहकाराशी प्रामाणिक राहू, असेही पाटील म्हणाले.

Share

-