अभिनेत्री मुनमुन सेनचे पती भरत देव वर्मा यांचे निधन:राजघराण्याशी संबंधित, ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला शोक

अभिनेत्री मुनमुन सेन यांचे पती, रायमा सेन आणि रिया सेन यांचे वडील भरत देव वर्मा यांचे आज कोलकाता येथे निधन झाले. आज 19 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील त्यांच्या घरी सकाळी 9 च्या सुमारास भरत देब वर्मा यांनी अखेरचा श्वास घेतला. वृत्तानुसार, भरत देव वर्मा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी कोलकाता येथील ढाकुरिया येथील एका खाजगी रुग्णालयातून रुग्णवाहिका बोलावण्यात आली. रुग्णवाहिका पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. ते 83 वर्षांचे होते. पतीच्या या जगातून अचानक जाण्याने मुनमुन सेनवर दुःखाचा डोंगर कोसळला. वडिलांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अभिनेत्री रायमा सेन कोलकात्याला रवाना झाली आहे. जेव्हा ही बातमी मिळाली तेव्हा ती जयपूरमध्ये शूटिंग करत होती. भारत देव वर्मा यांच्या निधनावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘मुनमुन सेन यांचे पती आणि माझे हितचिंतक भारत देव वर्मा यांच्या निधनाने मी दु:खी आहे. त्यांचे निधन माझ्यासाठी मोठे नुकसान आहे. भरत देव वर्मा राजघराण्यातील आहेत. ते त्रिपुराच्या राजघराण्यातील होते. भरत यांची आई इला देवी कूचबिहारची राजकुमारी आणि जयपूरची राणी गायत्री देवी यांच्या मोठ्या बहीण होत्या. भरत यांची आजी इंदिरा या वडोदराचे महाराज सर्जीराव गायकवाड तिसरे यांची एकुलती एक मुलगी होती. त्यांनी अभिनेत्री मुनमुन सेनसोबत लग्न केले होते. रायमा सेन आणि रिया सेन या अभिनेत्रींचे ते वडील आहेत.

Share

-