राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार:काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांचा दावा; एक्झिट पोलवर विश्वास नसल्याचेही केले स्पष्ट

राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे नेते तथा नागपूर उत्तर विधानसभा मतदाररसंघातील उमेदवार डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील जनतेची पहिली पसंती महाविकास आघाडी असल्याचा दावा देखील त्यांनी केला. विविध संस्थांनी दाखवलेल्या एक्झिट पोलवरही त्यांनी साशंकाता व्यक्त केली आहे. एक्झिट पोलमधील अंदाज हा खरा नसतो, असेही त्यांनी म्हटले आहे. एक्झिट पोलबद्दल, नागपूर उत्तरमधील काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत म्हणाले की, “…अनेक वेळा एक्झिट पोलमध्ये जर एखाद्याने काँग्रेसला खरेच मत दिले असेल, तर त्यांना असे वाटते की त्यांनी काँग्रेसला मतदान केले हे का उघड करावे. त्यामुळे एक्झिट पोलमध्ये ते सांगतात की त्यांनी भाजपला मतदान केले आहे. माझ्याकडे आलेल्या फीडबॅकनुसार महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येईल. मात्र, दुसरीकडे महायुतीनेही बोगस मतदानाची सोय केली होती. त्यांनी सर्व रणनिती वापरून गृहखाते, पोलिस दल, अनेक बूथवर लाईट बंद केले, त्यामुळे हे महायुतीचे सरकार हे हेराफेरीचे सरकार आहे. इतर पक्षांना तोडून बनवलेले सरकार असून हे मूळ नाही. त्यामुळे एक्झिट पोल काहीही दाखवू शकतात. मात्र, राज्यातील जनतेची पहिली पसंती महाविकास आघाडी असल्याचा दावा देखील त्यांनी केला. मतदारसंघात काँग्रेस – भाजप लढत नागपूर उत्तर विधानसभा मतदाररसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांची थेट लढत भाजपचे उमदेवार डॉ. मिलिंद माने यांच्यासोबत होत आहे. वास्तविक नितीन राऊत यांचा हा पारंवारीक मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघावर त्यांची चांगली पकड मानली जाते. असे असताना भाजपने या वेळी या मतदारसंघात चांगलीच ताकद लावली आहे. त्यामुळे आता 23 तारखेलाच या मतदारसंघाचा कौल कोणाला मिळाला? हे स्पष्ट होईल. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. राज्यातील राजकारणावर सट्टा बाजारातही वातावरण तापले:मोठ्या प्रमाणात उलाढाल; बहुमत कोणाला? कोणत्या पक्षाचे सरकार येणार? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनंतर आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे. मात्र यातच विविध संस्थांच्या वतीने एक्झिट पोलच्या माध्यमातून राज्यात सरकार कोणाचे येणार? यावर अंदाज मांडण्यात येत आहे. याच अंदाजात सर्वात महत्त्वाचा असतो तो सट्टा बाजार. राज्यातील सट्टा बाजारात सुद्धा राज्याच्या निवडणुकीवरून चांगलेच वातावरण तापले आहे. 23 नोव्हेंबर रोजी कुणाला बहुमत मिळणार आणि कोणत्या पक्षाचे सरकार येणार? हे स्पष्ट होणार असले तरी यामुळे सट्टा बाजारात चांगलीच उलाढाल झाल्याचे दिसून येत आहे. पूर्ण बातमी वाचा…. तारापूर एमआयडीसीत कारखान्याला भीषण आग:अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीजवळील एका कारखान्याला आज भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या बाबत अद्याप अधिकची माहिती मिळू शकली नाही. पूर्ण बातमी वाचा….

Share

-