Natepute Express
उसाचा दुसरा हप्ता 300 रुपये द्यावा, ‘स्वाभिमानी’ची कारखान्यांकडे मागणी:‘सहकार महर्षी’‎,‘ सहकार शिरोमणी’श्री पांडुरंगला दिले निवेदन‎
मुख्य बातमी 1/3

उसाचा दुसरा हप्ता 300 रुपये द्यावा, ‘स्वाभिमानी’ची कारखान्यांकडे मागणी:‘सहकार महर्षी’‎,‘ सहकार शिरोमणी’श्री पांडुरंगला दिले निवेदन‎

माळशिरस तालुक्यासह राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन 300 रुपये दुसरा हप्ता तातडीने अदा करावा. तसेच काही कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पहिला हप्ता अद्याप दिला नसेल तर तोही तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी केली. सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन मोहिते यांना संघटनेने निवेदन दिले. यावेळी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, भाळवणी, श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूर, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, गुरसाळे, विजय शुगर फॅक्टरी, करकंब, या साखर कारखान्याच्या व्यवस्थापनासही निवेदन देण्यात आले. यंदा रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरीचा उत्पादन खर्च वाढल्याने दुस-या हप्त्याची मागणी केली आहे. यावेळी ऊस दर संघर्ष समितीचे नेते दीपक भोसले, अजित बोरकर, सचिन पाटील, माने-देशमुख आदी उपस्थित होते. उसाच्या कांडीला सोन्याचा भाव मिळवून देऊ यंदा शेतकऱ्यांनी ऊस तोडीची घाई न करता थोडे थांबावे, उसाच्या कांडीला सोन्याचा भाव मिळवून देऊ. कर्नाटकातील कारखाने लवकर सुरू हो

तीर्थक्षेत्र बचाव समितीचा पर्यायी आराखडा; सर्वांना सोबत घेऊनच कॉरिडॉर
मुख्य बातमी 2/3

तीर्थक्षेत्र बचाव समितीचा पर्यायी आराखडा; सर्वांना सोबत घेऊनच कॉरिडॉर

पंढरपूर कॉरिडॉर बाबत तीर्थक्षेत्र बचाव समितीने मांडलेल्या सर्व मुद्द्यांचा आणि पर्यायी आराखड्याचा निश्चितपणे सकारात्मक विचार केला जाईल, पंढरपूरचा विकास 50 वर्षांचाविचार करुन सर्वांना सोबत घेऊन, समन्वयाने कॉरिडॉरची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ''''पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती''''च्या शिष्टमंडळाची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत बचाव समितीच्या वतीने कॉरिडॉरला ठाम पण संयमी स्वरात विरोध दर्शवत पर्यायी विकास आराखडा सादर करण्यात आला. या बैठकीस पालकमंत्री जयकुमार गोरे, स्थानिक आमदार समाधान अवताडे, राज्याचे मुख्य सचिव अग्रवाल, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, माजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हाधिकारी देशमुख, शेळके व इथापे यांच्यासह महाराष्ट्र शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नारळी पौर्णिमेनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी
मुख्य बातमी 3/3

नारळी पौर्णिमेनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात श्रावण मास, नारळी पौर्णिमा रक्षाबंधन सलग शनिवार, रविवार सुट्यामुळे वटवृक्ष मंदिरात भाविकांची गर्दी वाढत असून पहाटे पासून दिवसभर सुमारे एक लाख पेक्षा जास्त भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. पहाटे पाच वाजल्यापासुनच मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजुन गेले. 28 ऑगस्ट रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, यामुळे भाविकांची संख्या दुपटीने वाढली. हत्ती तलाव परिसर, अन्नछत्र मंडळ प्रांगणातील पार्किंगसह सर्वच पार्किंग भाविकांच्या वाहनाने भरून गेली होती. श्री वटवृक्ष स्वामी मंदिर ते समाधी मठापर्यंत मुख्य रस्त्यावर स्वामीभक्त दिसत आहेत. नारळी पौर्णिमेनिमित्त 50 हजार पेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले. पुरुष व महिलांसाठी दोन स्वतंत्र रांगा होत्या. मंदिर परिसर , अन्नछत्र मंडळ प्रांगण, समाधीमठ , राजेराय मठ, शिवपुरी, गुरुमंदिर आदी ठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती. तासाभरात सुमारे चार ते सहा हजार भाविक दर्शन घेत होते. तसेच समाधी मठ, चोळप्पा घर, राजेराय मठ, शिवपुरी , गुरुमंदिर, अन्नछत्र मंडळ आदी ठिकाणी गर्दी केली होती.

BUSINESS SPOTLIGHT Verified

देवत्व बेकर्स

हॉटेल व बेकर्स

★★★★★ (0.0)

आपल्या नात्यातील गोडवा वाढवणारे आपले हक्काचे ठिकाण!

क्विक टाउन सर्व्हिसेस

व्यवसाय ऑनलाईन आणायचा आहे?

वेबसाईट चालू करा →

महाराष्ट्रातील ताज्या बातम्या आणि नातेपुतेतील स्थानिक व्यवसायांचे विश्वसनीय व्यासपीठ

नातेपुते व आसपासच्या गावांसाठी WhatsApp-first digital portal.

NATEPUTE EXPRESS

Business • News • Ads

📰 मुख्य बातम्या

नातेपुते परिसर ताज्या घडामोडी

सर्व बातम्या पहा
महाराष्ट्र

उसाचा दुसरा हप्ता 300 रुपये द्यावा, ‘स्वाभिमानी’ची कारखान्यांकडे मागणी:‘सहकार महर्षी’‎,‘ सहकार शिरोमणी’श्री पांडुरंगला दिले निवेदन‎

माळशिरस तालुक्यासह राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन 300 रुपये दुसरा हप्ता तातडीने अदा करावा. तसेच काही कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पहिला हप्ता अद्याप दिला नसेल तर तोही तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी केली. सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन मोहिते यांना संघटनेने निवेदन दिले. यावेळी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, भाळवणी, श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूर, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, गुरसाळे, विजय शुगर फॅक्टरी, करकंब, या साखर कारखान्याच्या व्यवस्थापनासही निवेदन देण्यात आले. यंदा रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरीचा उत्पादन खर्च वाढल्याने दुस-या हप्त्याची मागणी केली आहे. यावेळी ऊस दर संघर्ष समितीचे नेते दीपक भोसले, अजित बोरकर, सचिन पाटील, माने-देशमुख आदी उपस्थित होते. उसाच्या कांडीला सोन्याचा भाव मिळवून देऊ यंदा शेतकऱ्यांनी ऊस तोडीची घाई न करता थोडे थांबावे, उसाच्या कांडीला सोन्याचा भाव मिळवून देऊ. कर्नाटकातील कारखाने लवकर सुरू हो

सोलापूर जिल्हा

तीर्थक्षेत्र बचाव समितीचा पर्यायी आराखडा; सर्वांना सोबत घेऊनच कॉरिडॉर

पंढरपूर कॉरिडॉर बाबत तीर्थक्षेत्र बचाव समितीने मांडलेल्या सर्व मुद्द्यांचा आणि पर्यायी आराखड्याचा निश्चितपणे सकारात्मक विचार केला जाईल, पंढरपूरचा विकास 50 वर्षांचाविचार करुन सर्वांना सोबत घेऊन, समन्वयाने कॉरिडॉरची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ''''पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती''''च्या शिष्टमंडळाची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत बचाव समितीच्या वतीने कॉरिडॉरला ठाम पण संयमी स्वरात विरोध दर्शवत पर्यायी विकास आराखडा सादर करण्यात आला. या बैठकीस पालकमंत्री जयकुमार गोरे, स्थानिक आमदार समाधान अवताडे, राज्याचे मुख्य सचिव अग्रवाल, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, माजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हाधिकारी देशमुख, शेळके व इथापे यांच्यासह महाराष्ट्र शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सोलापूर जिल्हा

नारळी पौर्णिमेनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात श्रावण मास, नारळी पौर्णिमा रक्षाबंधन सलग शनिवार, रविवार सुट्यामुळे वटवृक्ष मंदिरात भाविकांची गर्दी वाढत असून पहाटे पासून दिवसभर सुमारे एक लाख पेक्षा जास्त भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. पहाटे पाच वाजल्यापासुनच मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजुन गेले. 28 ऑगस्ट रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, यामुळे भाविकांची संख्या दुपटीने वाढली. हत्ती तलाव परिसर, अन्नछत्र मंडळ प्रांगणातील पार्किंगसह सर्वच पार्किंग भाविकांच्या वाहनाने भरून गेली होती. श्री वटवृक्ष स्वामी मंदिर ते समाधी मठापर्यंत मुख्य रस्त्यावर स्वामीभक्त दिसत आहेत. नारळी पौर्णिमेनिमित्त 50 हजार पेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले. पुरुष व महिलांसाठी दोन स्वतंत्र रांगा होत्या. मंदिर परिसर , अन्नछत्र मंडळ प्रांगण, समाधीमठ , राजेराय मठ, शिवपुरी, गुरुमंदिर आदी ठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती. तासाभरात सुमारे चार ते सहा हजार भाविक दर्शन घेत होते. तसेच समाधी मठ, चोळप्पा घर, राजेराय मठ, शिवपुरी , गुरुमंदिर, अन्नछत्र मंडळ आदी ठिकाणी गर्दी केली होती.

सोलापूर जिल्हा

पंढरपूर तालुक्यामधील 31,167 लाभार्थींच्या घरकुल यादीचे ग्रामसभेत झाले ’सोशल ऑडिट

पक्क्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना आशेचा किरण ठरणार आहे. योजनेच्या लाभासाठी वर्षभरापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात तालुक्यातील 95 गावांमधून तब्बल 31 हजार 167 कुटुंबांची नोंद झाली आहे. गावोगावी विशेष ग्रामसभा घेऊन या संभाव्य लाभार्थींच्या यादीचे वाचन करण्यात येत आहे. या ग्रामसभेत नागरिकांकडून हरकती व सूचनांची पडताळणी करुनच अंतिम यादी अपलोड केली जाणार आहे. तालुक्यातील विविध गावांमधून 18 हजार 51 नागरिकांनी स्वतः ऑनलाइन घरकुलांसाठी माहिती भरली असून, 13 हजार 116 कुटुंबांचे सर्वेक्षण ग्रामविकास अधिकाऱ्यांमार्फत केले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना पक्क्या घरासाठी शासनाकडून 1 लाख 20 हजारांची आर्थिक मदत दिली जाते. लाभार्थी निश्चित करण्याच्या प्रक्रियेत स्वतः ऑनलाइन सर्वेक्षण करून माहिती नोंदवण्याची संधी वर्षभरापूर्वी देण्यात आली होती. दोन्ही सर्वेक्षणातून तालुक्यात एकूण 31 हजार 167 नवीन संभाव्य लाभार्थींची यादी तयार झाली आहे.

सोलापूर जिल्हा

कुर्डुवाडीमध्ये एनडीआरएफचे थरारक मॉकड्रिल:रेल्वेच्या आपत्कालीन तत्परतेची घेतली चाचणी

तालुक्यातील दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी भाजपचे सिद्धाराम बाके तर उपसभापती म्हणून निंगाप्पा पुजारी यांची 13 विरुद्ध 5 मतांनी निवड झाली. शिवसेना शिंदे गटाचे शिवानंद पाटील व उपसभापती पदासाठीचे उमेदवार इराणा धसाडे यांचा पराभव झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. ए. गावडे यांनी काम पाहिले.या निवडीनंतर नूतन सभापती व उपसभापती यांचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. गुलालाची उधळण करत व फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

सोलापूर जिल्हा

बार्शी उपसा सिंचन योजनेला 1994 मध्ये मान्यता

जेन झी आणि अल्फा पिढी अधिक जागरूक असल्यामुळे बार्शी तालुक्यातील सिंचन योजनांच्या निर्मिती मागे कोणाचा पुढाकार होता हे नव्या पिढीला माहिती असणे गरजेचे आहे. बार्शी उपसा सिंचन प्रकल्पाला 1994 मध्ये प्रथम मान्यता, 1915 मध्ये युतीच्या काळात प्रशासकीय मान्यता व 2011 मध्ये वाढीव कामांना मिळाली मान्यता मिळाली. तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी मागील सुमारे 41 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत केलेल्या विविध प्रयत्नांचा आणि सिंचन योजनांच्या कामाची माहिती आमदार दिलीप सोपल यांनी पत्रकारांना दिली. ^कोणी काय केले आणि कोणी काय केले नाही, यापेक्षा तालुक्यासाठी आजपर्यंत काय केले हे जेन झी व अल्फा या तरुण पिढीला तसेच जुन्या पिढीतील विसरलेल्या लोकांना समजावे, यासाठी हा लेखाजोखा सादर केला आहे. दिलीप सोपल, आमदार, बार्शी 1994 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून उजनी बोगदा आणि बार्शी सिंचन योजनेला मंजुरी मिळाली . त्यानंतर 1995 ला महायुती सरकारच्या काळात प्रशासकीय मान्यता मिळाली. 2011 मध्ये वाढीव कामास दुसरी प्रशासकीय मान्यता मिळाली.

🚀 डिजिटल व्यवसाय क्रांती

तुमचे दुकान ऑनलाईन आणा आणि ग्राहक वाढवा!

नातेपुते एक्सप्रेसवर स्वतःची Business Website, digital card आणि WhatsApp enquiry मिळवा.

वेबसाईट तयार करा