जळगावमध्ये कार अन् बसचा भीषण अपघात:कारमधील तिघांचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी

जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यात बस आणि कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात कार मधील तिघांचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. तर एका जणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेमके काय घडले? मिळालेल्या माहितीनुसार चोपडा-नाशिक ही शिवशाही बस चोपडा बस आगारातून सकाळी 6 वाजता निघाली.
काही वेळातच चोपड्या पासून 5 किमी अंतरावरील सूतगिरणी जवळ शिवशाहीची समोरून येणाऱ्या कारचा
अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चोपडा शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ‘समृद्धी’ महामार्गावर ट्रॅव्हल्सवर दगडफेक अपघातांची मालिका थांबल्यानंतर समृद्धी महामार्गावर दरोडे, प्रवाशांवर हल्ले केल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. सोमवारी मध्यरात्री समृद्धी महामार्गावर बीबी गावाजवळ दोन माही ट्रॅव्हल्सच्या खासगी प्रवासी बसेसवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना उघडकीस आली. या दगडफेकीत चालक अन् 2 प्रवासी गंभीर जखमी झालेत. समृद्धी महामार्गावर बीबी गावाजवळ मध्यरात्री माही ट्रॅव्हल्सच्या या दोन्ही बसेस नागपूरकडून मुंबईकडे जात होत्या. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सिंदखेडराजा तालुक्यातील बीबी या गावाजवळ अज्ञातांनी दगडफेक केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने प्रवासी घाबरून केले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवली नाही. दगडफेक केल्यानंतर बस न थांबल्याने दगडफेक करणारे फरार झाले. दोन किमी अंतरावर बस थांबवून चाकलाने प्रसंगावधान राखत पोलिसांना फोन करून याबाबतची माहिती दिली. वाचा सविस्तर

Share

-