महायुतीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी‎:आमदार किरण लहामटे व‎ वैभव पिचड यांच्याकडून ‎एकमेकांवर टीका टीप्पणी‎‎

अकोले विधानसभा मतदारसंघात‎महायुतीमध्ये अंतर्गत राजकारण तापले‎असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू‎आहेत. नुकतेच अजित पवार यांनी‎अकोल्यातून महायुतीची उमेदवारी‎आमदार डॉ. किरण लहामटे यांना‎जाहीर केली. त्यावर भाजपचे नेते‎माजी आमदार वैभवराव पिचड‎म्हणाले, आमदार डॉ. किरण लहामटे हे‎बालिश आमदार आहेत. तर वैभव‎पिचड हा फ्रस्ट्रेट झालेला माणूस,‎त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही,‎अशी टीका डॉ. किरण लहामटे यांनी केली.‎ आजमितीस आमदार बाळासाहेब‎थोरात हे राज्यातील काँग्रेसचे व‎पर्यायाने मविआचे मातब्बर नेते आहेत.‎त्यामुळे त्यांची मदत मविआच्या‎उमेदवारास होईल, हे स्पष्ट आहे. अशा‎परिस्थितीत महायुतीचा उमेदवार‎निवडून आणण्यासाठी महायुती घटक‎पक्षांतील नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना‎शिकस्त करावी लागेल. महायुतीधर्म‎पाळून पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी‎येथील मतदारांपर्यंत पोहोचून ती मते‎आपल्याच पारड्यात कशी पडतील,‎याबाबत व्यूहरचना ठरवावी लागेल.‎महायुतीतील नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना‎जाहीरपणे, मला तुझी गरज नाही. मी‎तुझ्याकडे मते मागायला येणारच नाही,‎अशा घमेंडीत राहणारे उमेदवार‎निश्चित अडचणीत सापडेल.‎ ९ ऑक्टोबर रोजी आद्यक्रांतिकारक‎वीर राघोजी भांगरे जलाशय नामकरण ‎‎कार्यक्रमात महायुतीतील भाजपचे‎इच्छुक उमेदवार माजी आमदार वैभव ‎‎पिचड यांच्या प्रतिक्रियेवर राष्ट्रवादीचे ‎‎इच्छुक उमेदवार आमदार डॉ. किरण ‎‎लहामटे यांच्यात राजकीय तिरंदाजी‎पहायला मिळाली. पिचडांनी आमदार‎डॉ. लहामटे हे बालिश आहेत, असे‎संबोधले व आपल्याला भाजपाकडून‎उमेदवारी मिळण्याबाबत वरिष्ठांकडून‎सकारात्मक आहे. मला उमेदवारी‎मिळाल्यास महायुतीधर्म पाळून डॉ.‎किरण लहामटे यांच्याकडे मी मदत‎मागेल, असे सूचवले.‎ यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले,‎काय झाले, वैभव पिचड हा फ्रस्ट्रेट‎झालेला माणूस आहे. मागच्या‎विधानसभेत त्याला ५५ हजारांचा‎आकडा पार करता नाही आला.‎त्यावेळेला त्याची मनःस्थिती पार‎बिघडली होती. आता मधी आमच्याच‎काही कलाकारांनी दूध संघात त्याला‎वाचवले. आता परत तिकीटाचा वाद‎असल्याने मनःस्थिती बरोबर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎नसल्यामुळेच ते काहीही विधान‎करतात, त्याच्याकडे लक्ष देण्याची‎गरज नाही. महायुतीतील शिंदे‎शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख‎बाजीराव दराडे यांनी १० ऑक्टोबर‎रोजी महाराजा लाॅनवर झालेल्या‎शिवसैनिक मेळाव्यात डॉ. लहामटे‎यांना पुन्हा उमेदवारी‎दिल्यासकोणत्याही परिस्थितीत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎शिवसैनिक त्यांचा पराभव करतील,‎असा इशारा राज्य सचिव भाऊसाहेब‎चौधरी व संपर्कप्रमुख राजेंद्र चौधरी‎यांच्यासमोर दिला. आजून वेळ गेलेली‎नाही, महायुतीचा अजित पवार यांनी‎जाहीर केलेला उमेदवार बदला,‎अन्यथा महायुतीच्या उमेदवाराचा‎आजच पराभव झाला म्हणून समजा,‎असे सांगितले.‎ महायुतीच्या संदोपसुंदीवर मविआकडून चुप्पी‎ महायुतीतील या सुंदोपसुंदी राजकारणावर अद्यापपर्यंत मविआकडून कोणत्याच‎प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेल्या नाहीत, पण मतभिन्नतेचे वातावरण‎महायुतीतील घटक पक्षांतील नेत्यांसह पदाधिकाऱ्यांमधे शांत झाले नाही.‎महायुतीधर्म पाळला गेला नाही, तर अंतर्गत वादातून पक्षांतर्गत संघर्ष अधिक‎उफाळून येईल. हे राजकीय रणकंदन शांत होण्यावरच महायुती उमेदवाराचे‎आमदारीचे भवितव्य अवलंबून असेल.‎

Share

-