आकाच्या आकाचा आका कोण? ते महाराष्ट्राला कळायला हवे:खासदार सुप्रिया सुळेंचा प्रश्न; म्हणाले- लोक गायब होताहेत हे धक्कादायक

महाराष्ट्र मधील मोठ्या प्रमाणात लोक गायब होत असल्याची कबुली खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ही लोक गायब होने हे धक्कादायक असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटल आहे. गेली सहा वर्षे येथील नेतृत्वाने जो क्राईम वाढू दिला. त्यामुळे हे सर्व घडले असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आकाच्या आकाचा आका कोण आहे? हे महाराष्ट्राला कळायला हवे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. या संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी आकाच्या आकाचा आका कोण? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या माध्यमातून त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. राज्यात आणि देशभरातच होळीचा सण मोठ्या उत्साह साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सुळे यांनी हे आरोप केले आहेत. बीड जिल्ह्यातील परळी येथे मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढले असल्याचा आरोप या आधी देखील सुळे यांनी केला होता. आता या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा परळी जिल्ह्यातील गुंडा गिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दीडशेपेक्षा जास्त लोक गायब हे सर्व धक्कादायक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री देखील आहेत, त्यांनी स्वतः हे ऑन रेकॉर्ड सांगितले आहे की, येथून दीडशेपेक्षा जास्त लोक गायब आहेत. त्यामुळे हे सर्व धक्कादायक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. मग इतके वर्षे, सहा वर्षे येथील नेतृत्वाने जो क्राईम वाढू दिला. त्यामुळे सुरेश धसांच्या शब्दात सांगायचे तर येथील आकाच्या आकाचा आका कोण आहे? ते महाराष्ट्राला पारदर्शकपणे कळायला हवे, असे देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांना देखील मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यासह इतर सात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असल्यामुळे धनंजय मुंडे यांना देखील मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मात्र या सर्व प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी आता होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

Share