एजंट रेश्मा नऊ वर्षांपासून ट्रॅव्हल्सने नाशिकहून शहरात आणत होती ड्रग्ज:नाशिकच्या सप्लायरला ठोकल्या बेड्या, आणखी मोठे मासे मोकाटच

शहरात सुरू असलेल्या नशेखोरीत भर घालणाऱ्या सिरप औषधींच्या बाटल्या विक्रीवर एनडीपीएस पथकाने छापा मारला होता. या प्रकरणात तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, २०१५ पासून म्हणजे मागील ९ वर्षांपासून खासगी ट्रॅव्हल्सने नाशिकहून हे ड्रग्ज छत्रपती संभाजीनगर शहरात आणले जात होते आणि ते किलेअर्क, बायजीपुरा भागात विकले जात होते, अशी धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. या प्रकरणात एजंट रेश्मा अंजुम सय्यद एजाज (४५, रा. किलेअर्क), पेडलर युसूफ खान मेहबूब खान (२८, रा. बायजीपुरा) आणि मेडिसिन सप्लायर व्यावसायिक प्रवीण उमाजी गवळी (३२, जि. नाशिक) अशी आरोपींची नावे असून हे तिघेही सध्या अटकेत आहेत. एनडीपीएस पथकाने छापा मारून नशेच्या औषधींच्या ७६ बाटल्या जप्त केल्या होत्या. ही कारवाई १८ ॲाक्टोबर रोजी केली होती. यात रेश्मा सय्यद हिला ताब्यात घेतलेे. तपासात रेश्माला औषधी बाटल्यांचा पुरवठा करणारा ड्रग्ज पेडलर युसूफ खानला बेड्या ठोकल्या. त्यानंतर युसूफचा तपास केला. प्रवीण गवळीच्या मेडिकलवर छापा टाकून त्यास अटक केली. खान बायजीपुऱ्यात करत होता माल विक्री युसूफ खान हा बायजीपुऱ्यात राहत होता. मित्रांसोबत राहून त्याला हे व्यसन जडले होते. यातूनच त्याची सिरप विक्री करणाऱ्या टोळीशी ओळख झाली. त्याच्याकडून ड्रग्ज पुरवठा कसा केला जातो हे समजून घेतले. त्यानंतर मागील ३ वर्षांपासून हा व्यवसाय करत होता. प्रवीण ३ वर्षांपासून करत होता सप्लाय प्रवीण गवळी एका कंपनीच्या मेडिकल स्टोअरला काम करत होता. तिथे त्याने सिरप औषधींच्या रॅकेटची थिअरी अभ्यासून घेतली. त्यानंतर याच थिअरीने स्वत:चे मेडिकल स्टोअर सुरू करून ३ वर्षांपासून सिरप औषधी पुरवठा करण्याचे रॅकेट सुरू केले होते.

Share

-