अजित पवारांच्या शिलेदाराला नाना पटोले यांनी डिवचले:सत्तेची मौजमस्ती आणि देशाची संपत्ती विकून श्रीमंत होण्याचे काम करत असल्याची टीका

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवार यांचे खंदे समर्थक प्रफुल्ल पटेल यांना डिवचले आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका करत नाना पटोले यांनी जोरदार निशाणा साधला. पाच वर्ष सत्तेची मौजमस्ती करणे आणि देशाची संपत्ती विकणे आणि तिथूनच श्रीमंत होणे, असे काम या लोकांनी केल्याचे पटाले यांनी म्हटले आहे. प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा – गोंदिया जिल्ह्यातील जनतेची मत घेऊन त्यांना मोठी स्वप्न दाखवली होती. मात्र ती कधीच पूर्ण करण्याचे काम केले नसल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. भंडारा येथे एका कंपनीच्या भूमिपूजन सोहळ्यात नाना पटोले यांच्यावर प्रफुल्ल पटेल यांनी टीका केली होती. याला पटोले यांनी प्रत्युत्तर दिले. प्रफुल्ल पटेल यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचले असल्याची घणाघाती टीका देखील पटोले यांनी केली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा जिल्ह्याचा काहीही विकास केला नसल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. त्यांची विकासाची भूमिका असती तर त्यांनी मला आशीर्वाद दिला असता. पण आता ते कायम भावी राहणार असल्याचे पटाले यांनी म्हटले आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील जनतेने माझ्यावर कायम विश्वास दाखवला आहे. मला कायम आशीर्वाद दिला आहे. मात्र भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या विकासाचे गाजर दाखवून स्वयंभू नेते काम करत आहेत. मात्र आता विकास काय असतो हे भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या जनतेला काही महिन्यातच कळणार असल्याचा दावा देखील पटोले यांनी केला आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. रतन टाटांना राज्य सरकारची अनोखी श्रद्धांजली:गेल्या वर्षी पहिला पुरस्कार स्विकारणाऱ्या टाटांच्या नावानेच या पुढे उद्योगरत्न पुरस्कार राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराला आता रतन टाटा यांचे नाव देण्यात येणार आहे. त्यामुळे आता उद्योगरत्न रतन टाटा पुरस्कार असे या पुरस्काराचे नाव असेल. व्यवसाय, उद्योग, शिक्षण, रिअल इस्टेट, पर्यटन, वित्तीय सेवा, फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, कृषी, बँकिंग या क्षेत्रांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने हा पुरस्कार देण्याचा निर्णय गेल्या वर्षीच घेण्यात आला होता. त्यानंतर पहिलाच पुरस्कार रतन टाटा यांना प्रदान करण्यात आला होता. या पुरस्कारालाच त्यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. पूर्ण बातमी वाचा… रतन टाटा यांचे निधन:राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा; सर्व सरकारी कार्यक्रम रद्द, शासकीय कार्यालयांवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवणार देशातील आघाडीचे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगपती मुकेश अंबानी रात्री उशिरा रुग्णालयात पोहोचले होते. पूर्ण बातमी वाचा… रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी:शिवसेना नेत्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र; शिफारस करण्याची मागणी देश आणि जगातील सर्वात प्रसिद्ध अब्जाधीश उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे. गेल्या काही काळापासून आजारी असलेल्या 86 वर्षीय रतन टाटा यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील आणि जगातील अनेक व्यक्तींनी रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रतन टाटा यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. पूर्ण बातमी वाचा… आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला:राज ठाकरे यांनी जागवल्या आठवणी; रतन टाटा यांच्या श्नानप्रेमचा किस्साही सांगितला रतन टाटा यांच्या निधनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी रतन टाटा यांच्या सोबतच्या आठवणी देखील राज ठाकरे यांनी सांगितल्या. इतकेच नाही तर राज ठाकरे यांनी रतन टाटा यांच्या श्वान प्रेमाचा एक किस्सा देखील सांगितला आहे. रतन टाटा यांच्या निधनामुळे आज मी माझा ज्येष्ठ मित्र गमावला असून त्याचे दुःख आहेच, मात्र एकूणच भारताने कदाचित शेवटचा असा कर्तृत्वांतरही निर्लेप राहिलेला उद्योजक गमवल्याचे त्याहून मोठे दुःख असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा…

Share

-