अजित पवारांनी सिन्नरमधून निवडणूक लढवावी:माणिकराव कोकाटेंची खुली ऑफर; आपल्या घराट्यात बरे म्हणत, अजित पवारांचे बारामतीतूनच लढण्याचे संकेत

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी ऑफर माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांना दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सिन्नरमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांना ही ऑफर दिली आहे. मात्र अजित पवार यांनी आपल्या घरट्यात गेलेलेच बरे, असे म्हणत बारामतीला आपली पसंती असल्याचे स्पष्ट केले आहे. सिन्नर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात बोलताना माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांनी सिन्नर मधून निवडणूक लढवावी, त्यांना कमीत कमी दीड लाख मताधिक्याने निवडून आणू. जर त्यांच्या मताधिक्यात दीड लाखांपेक्षा एकही मत कमी मिळाले, तर मंत्रालयाची पायरी चढणार नसल्याचे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले. आपल्या घरट्यात गेलेलेच बरे मात्र दुसरीकडे अजित पवार यांनी याला उत्तर देताना माणिकराव कोकाटे यांच्या कामाचा कौतुक केले. आमदारांच्या हातात धमक आणि ताकद असावी लागते. तसाच आमदार तुम्हाला लाभला असल्याचे अजित पवार यांनी उपस्थितांना म्हटले आहे. मात्र बारामती माझी आहे. त्यामुळे आपल्या घरट्यात गेलेलेच बरे, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. मी नुसता दुसरीकडे लढणार अशी चर्चा बारामतीकरांनी ऐकली तरी त्यांनी मला घेराव घातला होता. त्यामुळे आपली बारामतीच बरी असल्याचे ते म्हणाले. बारामती माझी आहे, त्यामुळे आपल्या घरट्यात गेलेलेच बरे असे अजित पवार यांनी म्हटले आहे. बारामतीतून निवडणूक लढवण्याचे संकेत आपण त्याऐवजी स्पर्धा लावूयात असे म्हणत अजित पवार यांनी कोकटे यांना एका प्रकारे आव्हान दिले आहे. बारामतीचा आमदार जास्त मतांनी निवडून येतो की सिन्नरचा आमदार जास्त मतांनी निवडून येतो. ते आपण पाहू, असे अजित पवावर यांनी म्हटले आहे. या माध्यमातून अजित पवार यांनी पुन्हा एकदा बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

Share

-