सत्ता स्थापनेआधीच विरोधकांकडून अपेक्षांचा पाढा:अंबादास दानवेंनी मराठवाड्यासाठी व्यक्त केल्या अपेक्षा; महत्त्वाचे 10 मुद्देच मांडले

राज्य सरकारचा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी होत आहे. मात्र, त्या आधीच विरोधकांच्या वतीने नव्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा व्यक्त होत आहेत. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राची लूट थांबवण्याची मागणी केली असून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी 10 मुद्यांच्या माध्यमातून सरकारकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. या संदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. या सर्व अपेक्षा मराठवाड्यातील जनतेसाठीच्या आहेत. या नव्या नरकारने पूर्ण करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. इतकेच नाही तर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन देखील दानवे यांनी केले आहे. पक्षभेद, द्वेष बाजूला ठेवून या अपेक्षा पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अंबादास दानवे यांनी केलेली पोस्ट देखील पहा…. देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेत आहेत. त्यांचे अभिनंदन! विरोधी पक्ष म्हणून मराठवाड्यासाठी काही माफक अपेक्षा त्यांच्याकडून असतील… पक्षभेद, द्वेष बाजूला ठेवून हे मराठवाड्याला मिळेल ही अपेक्षा..

Share