अमेरिकन एअरलाइन्सचे विमान लष्करी हेलिकॉप्टरला धडकले:विमान आणि हेलिकॉप्टर नदीत पडले, 18 मृतदेह बाहेर, 64 जण होते विमानात

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये बुधवारी एक प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची धडक झाली. अपघातानंतर दोन्ही पोटोमॅक नदीत पडले. विमानात 4 क्रू मेंबर्ससह 64 लोक होते. वॉशिंग्टन अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार बुधवारी रात्री रोनाल्ड रीगन विमानतळाजवळ ही घटना घडली. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 18 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यूएस एअरलाइन्सचे CRJ700 Bombardier जेट आणि लष्कराचे ब्लॅक हॉक (H-60) हेलिकॉप्टर यांच्यात हा अपघात झाला. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. अमेरिकन एअरलाईन्सचे विमान कॅन्सस राज्यातून वॉशिंग्टनला येत होते. रात्री 9 नंतर कंपनीने अपघाताला दुजोरा दिला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 8:50 वाजता रीगन नॅशनल एअरपोर्ट (DCA) जवळ विमान अपघाताबाबत अनेक कॉल आले. सध्या विमानतळावर सर्व उड्डाणे आणि लँडिंग थांबवण्यात आले आहे. दोन्ही विमानांचे अवशेष पोटोमॅक नदीत आहेत. पाहा अपघाताचा व्हिडिओ… 4 जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले NBCच्या रिपोर्टनुसार, अपघातानंतर 4 जणांना पोटोमॅक नदीतून जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे. यावर ट्रम्प सातत्याने लक्ष ठेवून आहेत. राष्ट्रपतींनी लोकांना शांत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि अधिकाऱ्यांना बचावासाठी. उपाध्यक्ष जेडी वन्स यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेत अडकलेल्या लोकांसाठी त्यांनी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. बचावासाठी पाणबुड्यांना नदीत सोडण्यात आले सीएनएननुसार, लोकांना वाचवण्यासाठी पोटोमॅक नदीत पाणबुड्यांना सोडण्यात आले आहे. राष्ट्रीय हवामान सेवेनुसार, विमान अपघातानंतर पाण्यात जिवंत राहिलेल्या प्रवाशांना धोका असू शकतो. वॉशिंग्टनमध्ये तापमान शून्य अंशांच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत जे लोक पाण्यात पडतात त्यांना 20-30 मिनिटांत हायपोथर्मिया सुरू होऊ शकतो. कॅन्ससचे सिनेटर रॉजर मार्शल म्हणाले X- मला वॉशिंग्टन डीसी येथे विमान अपघाताची बातमी मिळाली आहे. आम्ही सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. आम्ही हे प्रत्येक प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी करतो. जीवितहानीबाबत सध्या कोणतीही माहिती नाही. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) नुसार, अमेरिकन एअरलाइन्सचे हे विमान रीगन नॅशनल एअरपोर्ट (DCA) च्या रनवे 33 जवळ येत असताना ब्लॅकहॉक H-60 ​​हेलिकॉप्टरला धडकले. क्रॅश झालेले विमान CRJ700 Bombardier विमान होते जे स्थानिक उड्डाणांसाठी डिझाइन केलेले आहे आणि त्यात 68 ते 73 प्रवासी बसू शकतात.

Share