राज्यपातळीवर शेतकऱ्याला हमी भाव देण्याचा प्रयत्न करणार:अमित देशमुख यांचे आश्वासन, विलास औताडे यांच्या प्रचारार्थ सभा

महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकणार नाही. विधानसभेची ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. या लढ्यात सर्वजण सहभागी झाल्यास विधानसभेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवता येईल, असा विश्वास व्यक्त करत सरकार आल्यास शेतकऱ्यांच्या मालाला राज्य पातळीवर हमी भाव देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ग्वाही राज्याचे माजी मंत्री अमित देशमुख यांनी दिली. करमाड येथे रविवारी महाविकास आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मध्य प्रदेशचे माजी मंत्री पी.सी. शर्मा खा. कल्याण काळे, जगन्नाथ काळे केशवराव औताडे, महाविकास आघाडीचे उमेदवार विलास औताडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अमित देशमुख म्हणाले की, स्वाभिमानाचा हा लढा महाविकास आघाडीने तुमच्यासाठी उभा केला आहे. तुम्ही या लढ्यात सहभागी होऊन फुलंब्री मधून विलास औताडे यांना निवडून आणा. फुलंब्री आणि लातूरचे एक वेगळे नाते आहे. विलास या नावाला नामुष्की येणार नाही याची काळजी मतदारसंघातील जनतेने घ्यावी. जालना लोकसभा मतदारसंघातून इतिहास घडवला त्याची पुनरावृत्ती विधानसभेला करावी असे आवाहन त्यांनी केले. लातूरमध्ये उद्योगधंदे नाहीत येथे असे लं असे वाटत होते, मात्र महायुतीच्या काळात उद्योगधंदे गुजरातला पळवले गेले महाविकास आघाडीचे सरकार आल्याशिवाय औद्योगीकरणाला गती मिळणार नाही. या मतदारसंघातही महायुतीने धनदांडगे उमेदवार दिले. सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हेच माहितीचे धोरण आहे. महायुतीचे नेते हे टक्क्याने ओळखले जातात तर महाविकास आघाडीचे नेते कर्तृत्व आणि ओळखले जातात शरद पवार राहुल गांधी उद्धव ठाकरे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारे नेते आहेत उद्धव ठाकरे यांनी कोविड काळात केलेले काम याची नोंद जागतिक पातळीवर घेतली गेली. दुसरीकडे महायुतीचे सरकार मधील नेते षडयंत्र रचत होते. फुलंब्रीत औताडे परिवार सत्तरच्या दशकापासून कार्यरत आहे. त्यांना यावेळी संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्राला 25 वर्ष आधार देणारी ही आघाडी पाच वर्षांपूरती नाही, मराठवाड्याचे मागासले पण दूर करण्यासाठी काँग्रेसला उभारी द्या.भाजप विकासाच्या नव्हे तर धर्माच्या नावावर राजकारण करते. धर्मगुरूंना ही टार्गेट केले जात आहे. मात्र आघाडी सरकार आल्यास या संदर्भात विशेष कायदा केले जाईल. श्रद्धेचे स्थान आहे तेथे राजकारण गेले जाते मात्र असे राजकारण करणाऱ्याचा प्रयत्न म्हणून पाडू.

Share