आमच्याकडे येणाऱ्यांपैकी 80% पदाधिकारी भाजपचे:शरद पवार यांचा दावा; दोन-तीन दिवसात निवडणुका जाहीर होण्याचा अंदाज

आमच्याकडे येणाऱ्यांपैकी 80 टक्के लोक हे भाजपचे असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. आमच्या पक्षात लोकांची आवक वाढली असल्याचा दावा देखील शरद पवार यांनी केला आहे. मात्र पक्ष निष्ठेची भूमिका हे ज्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे, त्या पक्षातून आमच्या पक्षात येणाऱ्या लोकांची संख्या का वाढली? असा प्रश्न मला पडला होता. याचे मला आश्चर्य वाटत होते. याचे उत्तरही मला एका वरीष्ठ नेत्याने दिले, असा दावा देखील पवार यांनी केला आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर-मोहाडी मतदार संघातील माजी आमदार चरण वाघमारे यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. पक्ष निष्ठेची भूमिका हे ज्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे, त्याच पक्षाचे लोक बाहेर पडत असल्याचे मला आश्चर्य वाटते. हा प्रश्न मी वरिष्ठ नेत्यांना विचारला होता. त्या वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितले की, तुम्ही जुन्या विचारांच्या पक्षाचे बोलत आहात. त्याकाळी संघटनेची चौकशी सुरू असताना एकही नेता बाहेर जाणारा नव्हता. कारण त्या पक्षातील नेतृत्व हे कार्यकर्त्यांचा सन्मान करणार होते. त्याच्यामागे उभे राहणारे होते. मात्र, आज ती स्थिती आमच्या संघटनेमध्ये राहिली नसल्याचे त्या नेत्याने मला सांगितले. त्यामुळेच पक्षावर पदाधिकाऱ्यांचा विश्वास दिवसेंदिवस कमी होत असल्याचे, त्या पक्षातील नेत्यानेच मला सांगितले आहे. आणि त्यामुळेच भाजपमधून लोक बाहेर पडत असल्याचे त्याच पक्षातील एका नेत्याने मला सांगितले असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. दोन-तीन दिवसात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता भारतीय जनता पक्षामध्ये आता सक्षम नेतृत्व राहिले नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यांच्याच पक्षातील नेत्याने मला आमच्या पक्षात येणारे लोकांची संख्या का वाढली याचे कारण सांगितले असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. निवडणुका अगदी तोंडावर आहेत. माझ्या माहितीप्रमाणे येत्या दोन-तीन दिवसात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याचा दावा देखील शरद पवार यांनी केला आहे. नवा-जुना असा वाद नको इतर पक्षातील लोक ज्यावेळेस आपल्या पक्षात येतात, तेव्हा त्यांच्यामध्ये नवा – जुना असा काही वाद राहू नये, सर्वांनी एकत्रित काम करावे, असा आवाहन देखील शरद पवार यांनी केले आहे. मात्र, त्यासाठी आता अतिशय कमी वेळ राहिला आहे. निवडणुका जाहीर झाल्या तर तुमची माझी सर्वांची शक्ती निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी लावली पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना केले. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. नवनीत राणा यांना सामूहिक बलात्काराची धमकी:आमिर नावाच्या व्यक्तीचे पत्र, पाकिस्तान जिंदाबादची घोषणा, 10 कोटी रुपयांची खंडणीही मागितली अमरावती येथील माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. पत्रात नवनीत राणा यांना गँगरेपची धमकी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्या घरासमोर गायीची कत्तल करणार असल्याचे म्हटले आहे.पत्र पाठवणाऱ्याने स्वत:चे नाव आमिर असे लिहिले आहे. त्याने 10 कोटी रुपयांची खंडणीही मागितली आहे. पाकिस्तान झिंदाबाद असेही लिहिले. आरोपीने चिठ्ठीत आपला फोन नंबरही लिहिला आहे. पूर्ण बातमी वाचा… देवेंद्र फडणवीस यांची हकालपट्टी करा, संजय राऊत आक्रमक:आतापर्यंतचा सर्वात निष्क्रिय गृहमंत्री म्हणत राज्यपालांकडे राजीनामा घेण्याची मागणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्णतः अपयशी ठरले असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अपयशी आणि निष्क्रिय असे गृहमंत्री असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा, असे सांगण्याची दुर्दैवी वेळ आमच्यावर आली असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा मागावा, अशी मागणी देखील त्यांनी केली. पूर्ण बातमी वाचा…

Share

-