राज ठाकरेंकडून दोन उमेदवारांची घोषणा:ठाण्यातून अविनाश जाधव तर कल्याण ग्रामीणमधून राजू पाटलांना उमेदवारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणखी दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मनसेकडून राजू पाटील आणि अविनाश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजू पाटील कल्याण ग्रामीणमधून तर अविनाश जाधव ठाण्यातून विधानसभा निवडणूक लढणार आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. राज ठाकरे म्हणाले, निवडणुकीतील उमेदवारांच्या यादीवर हात फिरवला जात आहे. आज किंवा उद्या पक्षाची दुसरी यादी जाहीर होईल. यादी जाहीर होण्यापूर्वी राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करतो, असे ठाकरे म्हणाले. 24 तारखेला अविनाश जाधव आणि राजू पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मी येणार आहे. अर्ज भरतेवेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे. मनसेची पहिली यादी राज ठाकरेंनी याआधी बाळा नांदगावकर (शिवडी, मुंबई), दिलीप धोत्रे (पंढरपूर), संतोष नागरगोजे (लातूर ग्रामीण), बंडू कुटे (हिंगोली विधानसभा), मनदीप रोडे (चंद्रपूर), सचिन भोयर (राजुरा), राजू उंबरकर (यवतमाळ) हे उमेदवार घोषित केले होते. राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतील बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. काही उमदेवारांसाठी त्यांनी सभा देखील घेतल्या होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर राज ठाकरे यांनी आता विधानसभेसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. राज ठाकरे महायुती, महाविकास आघाडी तसेच इतर कोणत्याही पक्षाला देणार नसल्याचे राज ठाकरे यांनी मागेच जाहीर केले. राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यंदाच्या विधानसभेला महायुती, महाविकास आघाडी, परिवर्तन महाशक्ती या तीन मोठ्या आघाड्या असून इतर काही पक्ष एकटे लढत आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे. हेही वाचा… अजित पवार गटाकडून एबी फॉर्म वाटपास सुरुवात:यादी पूर्वीच 17 जणांना दिले एबी फॉर्म, भाजपमधून आलेल्या गावितांनाही संधी भापजची पहिली यादी रविवारी जाहीर करण्यात आली. आज शिंदे गट आणि अजित पवार गटाची उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यादी जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून सोमवारी 17 जणांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. यामध्ये भरत गावित, सुनिल टिंगरे, संजय बनसोडे, चेतन तुपे यांसह 13 जणांना अर्ज देण्यात आले. पूर्ण बातमी वाचा…

Share

-