परिवर्तन महाशक्ती आघाडीची पहिली यादी जाहीर:बच्चू कडू अचलपूरमधून लढणार, राजू शेट्टी यांची पत्रकार परिषदेत घोषणा

परिवर्तन महाशक्तीची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 10 उमेदवारांची नावे जाहीर आहेत. राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संभाजी राजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्या परिवर्तन महाशक्ती आघाडीची पत्रकार परिषद सुरू आहे. पहिल्या यादीमध्ये बच्चू कडू, गणेश निंबाळकर यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी सत्ता भोगली आहे. मात्र आजही आपण केवळ मूलभूत प्रश्नांवरच चर्चा करत आहोत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राकडे लाँग टर्म व्हिजन बॉन्ड प्रोग्राम पहायला मिळत नाही. त्यामुळेच परिवर्तन महाशक्ती आघाडीची निर्मिती करण्यात आली आहे. 10-15 परिवर्तन महाशक्तीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चांगल्या उमेदवार आमच्या दररोज संपर्कात आहेत. टप्प्याटप्प्याने आम्ही उमेदवार जाहीर करणार आहोत, असे संभाजी राजे म्हणाले. मविआ, महायुती तुटणार
परिवर्तन महाशक्ती आघाडी विधानसभा निवडणूक लढवणार ही नाही, असे अनेकांना वाटत होते. पण आता आम्ही नावे जाहीर करत आहोत. आम्ही इतर पक्षांसारखे वेगवेगळे नावे जाहीर न करता एकत्र करत आहोत. भविष्यात आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. त्यातील एक पक्ष फुटून बाहेर निघणार आहे. तर महायुतीतील एक मित्र बाहेर जाणार असल्याचे आमच्या कानापर्यंत आले आहे, असा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला. आमच्या आघाडीला तिसरी म्हणणारे आता तिसऱ्यात जाण्याची शक्यता आहे आणि आम्ही पहिल्यात राहणार आहोत, असाही दावा बच्चू कडू यांनी केला. ही बातमी अपडेट करत आहोत

Share

-