औरंग्याची निशाणी नष्ट केली, आता कबरही उखडून काढू:शिवरायांच्या सैन्यात मुसलमान नव्हतेच, आपल्या नावापुढील हिंदू अडनावे शंभुराजेंमुळेच- नीतेश राणे

औरंग्याची निशाणी नष्ट केली आहे, आता कबरही उखडून काढू. तर छत्रपती संभाजी महाराज यांचे कसबा येथे असे स्मारक उभारू की, जगभरातील सर्वजण या ठिकाणी येऊन नतमस्तक होतील, असे मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे. नीतेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, औरंगजेबाची कबर उखडण्यासाठी तारीख किंवा वेळ घोषित केली जाणार नाही, लॉंग मार्च काढू. आपल्या नावापुढे जी हिंदू नावे दिसत आहे ही फक्त धर्मवीर संभाजी महाराज यांच्यामुळेच लागली आहेत. नेमके राणेंचे वक्तव्य काय? नीतेश राणे म्हणाले की, औरंगजेबची कबर उखडून काढू. सरकारने काढली नाही, तर आम्ही काढू. कबर काढण्यासाठी लाँग मार्च काढू. आम्ही हिंदू म्हणून व्यासपीठावर एकत्र आहोत. कसबा शास्त्रीपूल या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षण दिन समितीच्या वतीने संभाजी महाराज धर्मरक्षण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री नीतेश राणे बोलत होते. कारट्या औरंग्याने हिंदू धर्म संपवण्याची शपथ घेतली होती नीतेश राणे म्हणाले की, आपल्या नावापुढे जी हिंदू अडनावे दिसत आहे, ती छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे दिसत आहे. नाही तर आपल्या नावापुढे वेगळीच अडनावे दिसली असती. कुणी शेख असता तर कुणी खान असता. हिंदवी स्वराज्यांची लढाई ही इस्लामी करणाच्या विरोधातच झाली आहे. मुघलांनी जे इस्लामिक आक्रमन सुरू केले होते, त्या कारट्या औरंग्याने ज्या पद्धतीने आमची हिंदू मंदिरे तोडली. हिंदू माता-भगिणीचा छळ सुरू करत धर्म संपवण्याचा प्रयत्न केला. आमचा धर्म संपवण्याची शपथ त्याने घेतली होती. त्या औरंग्याला थांबवण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी केले आहे. शिवरायांच्या सैन्यात मुसलमान नव्हते नीतेश राणे म्हणाले की, आमच्यातील काही कारटे सांगतात की शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लीम होते, कोण मुसलमान शिवरायांच्या सैन्यात नव्हते. ही लोकं उगाच टेप रेकॉर्डर चालवतात. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती. हिंदू-विरुद्ध मुसलमान होती. 11 मार्च स्मरण दिन- जठार माजी आमदार प्रमोद जठार म्हणाले, ज्या ठिकाणी महाराजांनी लढाई केली त्या ठिकाणी महाराजांचे भव्यदिव्य स्मारक व्हावे, अशी इच्छा होती. सरदेसाई यांनी जागा द्यावी म्हणून प्रयत्न केले. स्मारकाला स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाइज असे नाव द्यावे, अशी मागणी केली. 11 मार्च स्मरण दिन असून, तो दिवस कधीही विसरणार नाही.

Share