बाळासाहेब थोरातांसाठी अंबादास दानवेंचा दुचाकीवर प्रचार:छत्रपती संभाजीनगरच्या अजबनगर ते क्रांती चौक मारली फेरी

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्यात निवडणुकीची रंगत वाढली आहे. प्रचार करण्याचे नव नवे फंडे राजकीय पक्षाकडून राबविले जात असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दुचाकीवर प्रचार करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. विरोधी पक्षनेते म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतो तो भला मोठा ताफा पण सामान्य शिवसैनिकांप्रमाणे अंबादास दानवे यांनी एका दुचाकीवर पक्षाचे निवडणूक चिन्ह लावत प्रचार केल्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हा दुचाकीवरील प्रचार आकर्षित करत होता. तसा संभाजीनगरच्या लोकांना शिवसेनेचा दुचाकीवरील प्रचार काही नवा नाही. पण दरवेळेस शिवसेनेचा दुचाकीवर प्रचार करणारे बंडू ओक हे स्वत: यंदा अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. यातच आता अंबादास दानवे देखील दुचाकीवर प्रचार करत मतदारांपर्यंत पोहचत आहे. सरकारचे मराठवाड्यावर पूर्ण दुर्लक्ष अंबादास दानवे म्हणाले की, राज्यातील सरकारने मराठवाडा आणि संभाजीनगरकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. यावेळी जिल्ह्यातील नऊही विधानसभा मतदार संघात महाविकास आाघाडीचे उमेदवार निवडून देऊन विकासासाठी मतदारांनी आघाडीला भरभरुन आशिर्वाद द्यावे. आज दुचाकीवर प्रचार करुन पुन्हा कॉलेज जीवनाची आठवण आली. आमच्यासाठी चारचाकी अन् दुचाकी यापेक्षा महत्त्वाचा आमचा पक्ष आहे. 5 आमदार गेले शिंदेंसोबत शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर संभाजीनगरमधील शिवसेनेचे 5 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. यातच अंबादास दानवेंकडे विरोधी पक्षनेतेपद असताना झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे ही निवडणूक ठाकरे गटासाठी महत्त्वाची ठरणार आहे. मोदींचे भाषण अन् भाजपची तयारी शहरात भाजपने इतर मागासवर्गाच्या 30 महत्त्वाच्या आणि मतदानात अव्वल असलेल्या जातींसोबतची वीण अधिक घट्ट केली आहे. शहरात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या 52 वसाहती प्रचारासाठी भाजपकडून निवडण्यात आल्या आहेत. विरोधकांनी संविधान बदलाचे नरेटिव्ह सेट केल्याने लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. विरोधकांच्या नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी भाजप 52 वसाहतींमध्ये जाऊन केंद्र व राज्याने केलेल्या कामांचा पाढा वाचत आहे. शहरातील बुद्धिजीवी, नवमतदार, महिला, युवक आदींचे संमेलन घेत आहे. सुरक्षा, शिष्टाचार लेखाजोखा, साहित्य, होर्डिंग प्रमुख अशा 39 समित्या बनवण्यात आल्या होत्या,असे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सांगितले. मध्य मतदारसंघात मराठा, मुस्लिम, दलितांच्या मतांवर भिस्त मध्य मतदारसंघात मुस्लिम मतांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे एमआयएमचा मराठवाड्यातील पहिला आमदार याच मतदारसंघातून निवडून आला. त्यामुळे मुस्लिम, मराठा, दलित या मतांची संख्या या निवडणुकीचे गणित बदलणारी आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांना इथे 85,937 मतदान मिळाले होते. हे मतदान मध्यमध्ये गेल्या तिन्ही विधानसभा जिंकणाऱ्या विजयी उमेदवारापेक्षा जास्त होते. त्यामुळे एमआयएमच्या वतीने नासेर सिद्दिकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मराठा समाजाची मते मिळावीत यासाठीच उद्धवसेनेचे किशनचंद तनवाणी यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. परंतु किशनचंद तनवाणी यांच्या माघारीच्या शक्यतेने विविध चर्चांना उधाण आले आहे. मध्य मतदारसंघात शिंदेसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल, उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, एमआयएमचे नासेर सिद्दिकी असा सामना रंगणार होता. यासह वंचित आणि इतर पक्षाचे उमेदवारही यामध्ये आणखी रंगत वाढवणार आहेत. मध्यमध्ये सर्वाधिक मुस्लिम मतदार शहरात सर्वाधिक मुस्लिम मतदारांची संख्या मध्य मतदारसंघात आहे. येथे 1 लाख 20 हजार मतदार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे लोकसभेचे उमेदवार इम्तियाज जलील यांना याच मध्य मतदारसंघात 85,937 मते मिळाली होती. 2009, 2014 आणि 2019 या तिन्ही विधानसभा निवडणुकीत विजयी उमेदवारांच्या मतांपेक्षा हे मतदान जास्त आहे. 2009 मध्ये अपक्ष उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी विजय मिळवला होता. त्या वेळी त्यांना 49,965 मते मिळाली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सय्यद अब्दुल कदीर यांचा 8,384 मतांनी पराभव केला होता. 2014 मध्ये प्रदीप जैस्वाल मध्य मतदारसंघातून पराभूत झाले होते. त्यांना 41,861, तर इम्तियाज जलील यांना 61,481 मते मिळाली होती. मात्र 2019 मध्ये 82,217 मते घेत प्रदीप जैस्वाल विजयी झाले होते. त्यांनी एमआयएमच्या नासेर सिद्दिकींचा 13,892 मतांनी पराभव केला होता. मराठा व ओबीसीमध्ये होणार मतविभागणी या मतदारसंघात यापूर्वीच्या तिन्ही विधानसभा निवडणुकीत हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी पारंपरिक लढत होते. मात्र जरांगेंच्या आंदोलनामुळे हिंदूंमधल्या मराठा व ओबीसी यामध्येदेखील विभागणी झाली आहे. या मतदारसंघात 35 हजार मराठा मतदान आहे. त्यामुळेच उद्धवसेनेचे किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी मनोज जरांगे यांची सदिच्छा भेट घेतली होती. दलितांचे 50 हजार मतदान निर्णायक या मतदारसंघात जवळपास 50 हजार मतदान दलित समाजाचे आहे. त्यामुळे मुस्लिम, दलित मतदान एकत्र आले तर या मतदारसंघाचे चित्र बदलते. वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ यांना 2019 मध्ये 27,032 मते मिळाली होती. हे प्रमाण 14 टक्के इतके होते.

Share