भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य राजद्रोह:सभागृहात त्यांच्या निषेधाचा ठराव घ्या, नसता तुम्ही मराठी आईचे दूध पिलेले नाही; संजय राऊत संतापले

मराठी ही आमची राजभाषा आहे. मराठी ही राजभाषा असल्यामुळे भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य राजद्रोह असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईची भाषा ही मराठी नसल्याचे भैय्याजी जोशी यांनी म्हटले होते. भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य महायुती सरकारने कसे सहन केले? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. भैय्याजी जोशी हे भाजपचे धोरण ठरवणारे व्यक्ती असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. दोन मिंद्या आणि लाचार उपमुख्यमंत्र्यांनी देखील या वक्तव्याचा निषेध करायला हवा, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत येऊन असे वक्तव्य करण्याचे धाडस त्यांनी कसे केले? मुंबई ही मराठी माणसाची नाही हा अपमान नाही का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जोशींने केलेले वक्तव्य अधिकृत भूमिका आहे का? हे जाहीर करावे आणि तसे नसेल तर विधिमंडळात भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध करायला हवा, तसा ठराव विधिमंडळात मंजूर करायला हवा, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार कुठे आहेत? असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. बाळासाहेब ठाकरेंनी मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी जीवन पनाला लावले होते. आज त्यांच्या विचाराचे वाहक म्हणणारे बसलेले आहेत. त्यांच्यात हिम्मत असेल त्यांनी भैय्याजी जोशी यांचा निषेध करावा. असे आवाहन देखील राऊत यांनी दिले आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…

Share