आडगाव येथे मृगदायनवनात महासंघदान:कठीण चिवरदान सोहळा व धम्म स्कूल आणि भिक्खू ट्रेनिंग रिसर्च सेंटरचे भूमिपूजन
धम्ममय भारत मिशनअंतर्गत बुद्धरूप प्रतिस्थापना, धम्म स्कूल आणि भिक्खू ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे भूमिपूजन, तसेच कठीण चिवरदान सोहळ्याचे व भिक्खू ग्यानरक्षित थेरो यांच्या आरोग्यासाठी महापरित्राणपाठ सोहळा आडगाव जावळे येथील संघगिरी महाविहार मयूर मृगदायनवनात शनिवारी उत्साहात पार पडला. मैत्रेय चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भिक्खू ग्यानरक्षित थेरो यांच्या धम्ममय भारत मिशन संकल्पअंतर्गत पैठण तालुक्यातील आडगाव जावळे येथील सात एकर विस्तीर्ण जागेवर संघगिरी महाविहार उभारले जात आहे. या जागेवर पूज्य भिक्खू संघाच्या हस्ते शनिवारी रोजी हा सोहळा झाला. सकाळी पाच वाजल्यापासून ते सायंकाळी साडेसातपर्यंत विविध कार्यक्रम राबवण्यात आले. ज्यात सामूहिक ध्यानसाधना, अष्टशील प्रदान, धम्म ध्वजारोहण पूज्य भिख्यू बोधिपालो महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले, तर महाकारुणिक भगवान बुद्धांची मूर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिधातूचे आणि कठीण चिवरदानासह पूज्य भिक्खू संघाची सजवलेल्या रथातून धम्म मिरवणूक आडगाव जावळे या गावातील मुख्य रस्त्यापासून तर संघगिरी महावीर मयूर मृगदायनवनातील कार्यक्रमाच्या स्थळापर्यंत काढण्यात आली. या सोहळ्यास श्रीलंका येथील महामेवाना विहारातील भिक्खू शांतचित्त, भिक्खू यश, भिक्खू गुणानंद अभिभू, पुज्य भिखू पुण्णसह मोठ्या प्रमाणात भिक्खू संघ श्रामणेर, भिक्खू संघ, तसेच कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, माजी आरटीओ अधिकारी अनिलकुमार बस्ते, बी. के. अदमाने, लक्ष्मण गायकवाड, शेषराव जोगदंड, शिवाजी वाघमारे, राहुल साळवे, अमरदीप गायकवाड आदींची उपस्थिती होती.