भूषण कुमार यांचा मोठा खुलासा:अजय देवगण आणि रोहित शेट्टीवर लावले गंभीर आरोप, म्हणाले- ‘भूल भुलैया 3 सोबत अन्याय झाला’

कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 3 ची अजय देवगणच्या सिंघम अगेनशी टक्कर झाली. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. अलीकडेच टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांनी एका मुलाखतीत अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांच्यावर गंभीर आरोप लावले. त्यांनी सिघम अगेनच्या टिमला अन्यायकारक म्हटले. कनेक्ट सिनेशी नुकत्याच झालेल्या संभाषणात भूषण कुमार यांनी खुलासा केला की, ‘भूल भुलैया 3’ आणि ‘सिंघम अगेन’ रिलीज होण्यापूर्वी, सिंघम अगेनच्या टिमसोबत स्क्रिनच्या समान शेअरींगबाबत माझा वाद झाला होता. हे दोन्ही चित्रपट मोठे आहेत, त्यामुळे दोघांना समान स्क्रिन स्पेस मिळायला हवा, असे माझे मत होते. मला या प्रकरणात निष्पक्षता हवी होती, परंतू काही वैयक्तिक हितसंबंधांमुळे ते होऊ शकले नाही. सिंघम अगेनची टिम याबाबत अन्यायकारक होती, तथापि मी थिएटर चेनला दोष देऊ इच्छित नाही, कारण ते दुसऱ्या चित्रपटाचे वितरक होते आणि त्यांच्या समस्या काही वेगळ्या होत्या. यानंतरही त्यांनी आम्हाला साथ दिली. भूषण कुमार म्हणाले, मी अॅडव्हान्स बुकींग सुरु करण्याची सुचना केली होती, जेणेकरुन चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता येईल. भूल भुलैया 3 हा मोठा चित्रपट असुनही 36 कोटींहून अधिक कमाई केली. खरे तर दोन्ही चित्रपटांनी चांगली कमाई केली. चित्रपटांमधील संघर्षांबाबत भूषण कुमार म्हणाले की, दोन्ही टिम संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करत होते. पण कोणत्याही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलणे शक्य नव्हते. त्यांनी अजय देवगण आणि रोहित शेट्टीला सांगितले की त्यांनी याआधी भूल भुलैया 3 ची घोषणा केली होती आणि त्याचे ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही डिल्स झालेल्या आहेत, त्यामुळे ते चित्रपटाला पुढे ढकलू शकत नाही. सिंघम अगेनच्या टिमला हे समजले, परंतू त्यांच्या चित्रपटाची थीम रामायणाशी संबंधित होती आणि ते दिवाळीला रिलीज करणे चुकवू शकत नव्हते. रोहित शेट्टीला सर्व सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन टायटल ट्रॅक हटवावा लागला
जेव्हा यूट्यूबवर सिंघम अगेनचे टाइटल ट्रॅक रिलीज केले गेले, तेव्हा लगेचच टी-सीरीजने त्या व्हिडिओवर कॉपीराइट जारी केला होता. टी-सीरीजने दावा केला की टाइटल ट्रॅकमध्ये मुळ 2011 च्या सिंघम चित्रपटातील घटक आहे, ज्याचे हक्क टी-सीरीजच्या मालकीचे आहे. यानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टीला सर्व सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन टायटल ट्रॅक हटवावा लागला. टायटल ट्रॅक एडिट करुन पुन्हा यूट्यूबवर अपलोड करावे लागले. मिडिया रिपोर्ट्सनुसार, सिंघम अगेनच्या टायटल ट्रॅकमध्ये सिंघम चित्रपटाच्या थीमच्या 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ समाविष्ट आहे, तर कॉपीराइट धोरणानुसार, जर कोणत्याही गाण्यात तीन सेकंदांपेक्षा जास्त घटक असतील तर त्यावर कॉपीराइटचा दावा केला जाऊ शकतो .

Share