भाजप आमदार परिणय फुके यांचे खुले आव्हान:अनिल देशमुख मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी

भाजपचे आमदार व माजी मंत्री परिणय फुके यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना थेट आव्हान दिले आहे. अनिल देशमुख खरेच मर्द असतील तर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दक्षिण पश्चिममधून निवडणूक लढवावी, असे आव्हानच परिणय फुके यांनी केले आहे. रिकामे राहण्यापेक्षा त्यांनी फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असे परिणय फुके म्हणाले आहेत. परिणय फुके म्हणाले, अनिल देशमुख यांची औकात नाही. त्यांचा मुलगा त्यांना काटोल मतदारसंघातून लढू देणार नाही. रिकामे राहण्यापेक्षा त्यांनी फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी. अनिल देशमुख खरे मर्द असतील तर देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दक्षिण पश्चिममधून निवडणूक लढवावी, असे खुले आव्हान परिणय फुके यांनी दिले आहे. दरम्यान, आता परिणय फुके यांनी दिलेल्या या आव्हानावर अनिल देशमुख काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा नागपूर मतदारसंघाचा भाग असून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नेते व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तब्बल 1,09,237 मते मिळवत विजयी झाले होते. देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसचे डॉ. आशिष देशमुख यांचा 49,344 मतांनी पराभव केला होता. तसेच नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जातो. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीकडून जागावाटपावर चर्चा सुरू असून ही चर्चा आता अंतिम टप्प्यात आली असल्याचे समजते. शुक्रवारी जागावाटप तसेच उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Share

-