भाजपची विचारसरणी म्हणजे बाबासाहेबांचा अपमान – राहुल गांधी:म्हणाले – भाजपचे सर्व लाजिरवाणे प्रयत्न अयशस्वी होतील अन् जात जनगणना होईल

राहुल गांधींची ध्येयधोरणे पाहता ते अराजकता पसरवणारी यंत्रणा आहे. लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून ते कोणाला इशारा देत आहेत? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. तसेच, यापेक्षा अर्बन नक्षलवाद वेगळा नसल्याचेही फडणवीस म्हणाले होते. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया X वर फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजपची विचारसरणी म्हणजे बाबासाहेबांचा अपमान राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मते, बाबासाहेबांचे संविधान दाखवून जात जनगणनेसाठी आवाज उठवणे ही नक्षलवादी कल्पना आहे. भाजपची ही विचारसरणी म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यघटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने संविधानासाठी लढून महाविकास आघाडीला मोठा विजय मिळवून दिला. महाराष्ट्रातील जनता भाजपकडून वारंवार होत असलेला बाबासाहेबांचा अपमान सहन करणार नाहीत. महाराष्ट्रातील लोक काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबत संविधानावरील प्रत्येक हल्ल्याला पूर्ण ताकदीने उत्तर देऊन त्याचे रक्षण करतील. भाजपचे असे सर्व लाजिरवाणे प्रयत्न अयशस्वी होतील, जात जनगणना होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते? भारत जोडो असा ग्रुप करण्यात आला. ज्यामध्ये अनेक संघटना सामील झाल्या आहेत. ज्या संघटना डाव्या विचारांच्या आहेत. त्यांची ध्येयधोरणे पाहता ती अराजकता पसरवणारी यंत्रणा आहे. राहुल गांधी एक पुस्तक दाखवतात. संविधानाचा सन्मान सर्वांनीच केला पाहिजे, मग लाल संविधान कशासाठी? लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहेत? तुम्ही या माध्यमातून अराजकता पसरवत आहात. भारत जोडोच्या माध्यमातून अराजकता पसरवली जात आहे. अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र म्हणाले होते. नरेंद्र मोदींनी रामनाथ कोविंद यांना भेट दिलं होतं लाल संविधान संविधान हे पवित्र आहे. संविधान आपल्या प्रजासत्ताकाचा पायाभूत कायदा आहे. त्याला रंगामध्ये अडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत, हे दुर्दैवी आहे, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. राहुल गांधींच्या हाती असलेल्या ज्या लाल संविधानाचा फडणवीसांनी उल्लेख केला. तेच संविधान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेट दिली होती. याबाबत फडणवीस यांचे काय मत आहे? असा सवालही त्यांनी विचारला. वाचा सविस्तर बातमी… या संबंधित ही पण बातमी वाचा… राहुल गांधींवर खोट्या केसेस लावल्या जात आहेत:त्यांच्या केसाला जरी धक्का लावला तर देश पेटून उठेल, नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल​​​​​​​ ​​​​​​​कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन जातिनिहाय जनगणना आणि आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार असल्याचे जाहीर करत थेट भाजपला मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यानंतर भाजपने राहुल गांधी यांना नक्षल समर्थक असल्याचा आरोप देखील केला आहे. यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे. राहुल गांधींचे तोंड बंद करण्यासाठी खोट्या केसेस दाखल केल्या जात असल्याची टीका पटोले यांनी केली आहे.​​​​​​​ वाचा सविस्तर बातमी…

Share

-