दोन कुळांचा उद्धार करणारी महिला ही सर्वश्रेष्ठच:कुंदनऋषीजी महाराज

प्रतिनिधी | अहिल्यानगर दोन कुळांचा उद्धार करणारी नारी सर्वश्रेष्ठ आहे. महिलांनी आपल्या कर्तृत्वाने प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. पूर्वी मुलाचा जन्म झाल्यावर आनंद साजरा केला जात होता, तर मुलगी झाल्यावर दुःखी होते, परंतु आता बदल झाला आहे. मुलापेक्षा मुलगी ही गुणवान मानली जाते. दीपकप्रमाणे ती दोन परिवारांचे नाव रोशन करीत असल्याचे महाराष्ट्र प्रवर्तक श्री कुंदनऋषिजी महाराज यांनी सांगितले. आनंदधाम येथे आयोजित आनंद व्याख्यानमालेत ते बोलत होते. साध्वी पुनीतदर्शनाजी म्हणाल्या, की आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहे. स्त्रीशक्तीची अनुभूती ही राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, कल्पना चावला, किरण बेदी, मदर तेरेसा यांच्या रुपाने दुनियेसमोर आहे. घर, परिवार, समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी स्त्रियांनी चार बाजू सांभाळणे आवश्यक आहे. बेअरिंग म्हणजे सहनशीलता वाढवली पाहिजे, केअरिंग म्हणजे, घर-परिवारातील नात्यांची काळजी, शेअरिंग म्हणेज, सद्भावना, सद्गुण सर्वांना वाटणे, तर डेअरिंग म्हणजे हिंमत दाखवणे. संस्कार दिवाकर आलोकऋषिजी यांनी मार्मिक प्रवचनातून नारी जातीला संदेश दिला. नारीशक्ती ही सेवा, स्नेह, समता, संस्काराची सुंदर प्रतिमा असल्याचे ते म्हणाले. डॉ. आलोकऋषिजी यांना गुरूसेवेत अर्पण करणारी माता सुशिलाबाई अशोक बाफना, आराधना यांच्या आई कमलबाई बन्सीलाल मुनोत,सुविज्ञाजी व भारवीजी या साध्वीजींच्या आई प्रतिभा नवनीत गांधी, श्रेयलश्रीजी यांच्या आई त्रिवेणी संतोषजी बोरा यांचा सत्कार करण्यात आला.

Share