विरोधकांचा चहापाण्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार:राजकीय गुंडांना आश्रय देणाऱ्या सरकारच्या चहापाण्याला जाण्यात अर्थ नाही, वडेट्टीवारांचा हल्लाबोल

नागपुरात उद्यापासून हिवाळी अधिवशन सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी सायंकाळी सत्ताधाऱ्यांकडून चहापाण्याचा कार्यक्रम ठेवला आहे. परंतु या चहापाण्यावर विरोधकांकडून बहिष्कार टाकण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज नागपुरात एक बैठक पार पडली. या बैठकीत सत्ताधाऱ्यांच्या चहापाण्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णत: उद्ध्वस्त झालेली आहे. एका सरपंचाचा उचलून नेऊन खून केला जातो. त्या प्रकरणात राजकीय आरोपी आहेत. सरपंचांचा खून करण्याऱ्यांना पाठबळ असणाऱ्या नेत्याला मंत्रिपदाची शपथ दिली जाणार असल्याची चर्चा आहे. राजकीय गुंडांना आश्रय देणारे सरकार असेल, तर चहापाण्याला जाण्यात काय अर्थ आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. महिलांवर खुलेआम अत्याचार, बलात्कार होत आहेत. त्यासंदर्भात सरकारला गांभीर्य नाही. या राज्यातील सामान्य माणूस, शेतकरी यांच्या हक्काचे संरक्षण करण्याची सरकारची भूमिका अधिवेशनाच्या अल्पावधीत दिसून येत नाही. म्हणूनच आम्ही चहापाण्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. हे अधिवेशन अधिक कालावधीसाठी चालवण्याची मागणी केल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. बातमी अपडेट करत आहोत…

Share