बनावट आधारकार्ड तयार करून कारची परस्पर विक्री:मालकाने पोलिसांच्या मदतीने कार पुन्हा मिळवली, पुण्यातील घटना

व्यवसायाकरिता कार भाडdयाने घेऊन ती बनावट आधारकार्ड व कागदपत्रे तयार करुन एकाने परस्पर विक्री करत १२ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी काेथरुड पाेलिस ठाण्यात युग्मेश माेहन साेनार (वय-२८,रा.काेथरुड,पुणे) यांनी आराेपी शशांक विनाेद दारकाेंडे (रा.नागपूर) याच्याविराेधात फिर्याद दाखल केली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शशांक दारकोंडे यांनी तक्रारदार युग्मेश साेनार यांच्या ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना व्यवसायकरिता भाडेतत्वावर गाड्या विकत घेण्याचे अमिष दाखवून त्यांची स्विफ्ट डिझायर (एमएच १२ व्हीएफ ३८२६) ही कार भाडेतत्वावर चालविण्यास घेतली. परंतु सदर गाडी आरोपीने तक्रारदार यांचे खोटे व बनावट आधारकार्ड तयार करून त्यावर स्वतःचा फोटो चिकटवून संताेष रामचंद्र गुळवे नामक व्यक्तीस परस्पर विक्री केली. मात्र, पाेलिसांच्या मदतीने साेनार यांनी सदर गाडी ही संताेष गुळवे यांच्याकडून परत मिळवली. या प्रकरणी व्यवसायाकरिता भाडेतत्वावर दिलेली गाडी बनावट कागदपत्रे आधारे विक्री केल्याने आराेपीवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गॅस बील भरण्याच्या अमिषाने गंडा धायरी परिसरात राहणाऱ्या सुनीता संदीप गट (वय-५८) यांना अनाेळखी व्यक्तीने फाेन करुन एमएनजीएल गॅसचे बील भरले नसल्याने तुमचे गॅस कनेक्शन बंद करण्यात येईल असा मेसेज केला. त्या मेसेजमधील एमएनजीएल अधिकारी देवेश जाेशी यांनी तक्रारदार यांना काॅल करुन त्यांना व्हाॅटसअपवर प्राप्त झालेली एपीके फाईल डाऊनलाेड करण्यास सांगितली. डेबीट कार्डची माहिती त्यांना भरण्यास सांगून ओटीपी प्राप्त केला. त्यानंतर त्यांच्या संमतीशिवाय एकूण १७ ट्रान्झॅक्शनद्वारे एकूण नऊ लाख ७९ हजार रुपये आराेपीने काढून घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत सिंहगड राेड पाेलिस पुढील तपास करत आहेत.

Share

-