सहा सरकते जिने, लिफ्ट 6:दर तासाला 1200 प्रवाशांचे ‘चेक इन’ शक्य होणार, प्रवाशांना मिळणार अशा सुविधा‎

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्टवर सुमारे ६५० कोटी रुपये खर्च करून नवीन टर्मिनल उभारले जात आहे. त्याच्या कामाचा शुभारंभ बुधवारी पंतप्रधानांच्या हस्ते झाला. टर्मिनल उभारणीचे काम २०२६ पर्यंत पूर्णत्वास जाणार असल्याचे सांगण्यात येते. देश-विदेशात साईभक्त असून, शिर्डीत दर्शनासाठी येण्यासाठी हे विमानतळ महत्वाचे आहे. येथे उभारण्यात येणाऱ्या टर्मिनलमध्ये प्रवाशांसाठी विविध सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यात प्रवाशांसाठी सहा लिफ्ट व तितकेच सरकते जीने आहेत. शिवाय एकाच वेळी १२०० प्रवाशांची विमानात ऑपरेशन क्षमता होणार असल्याचे सांगण्यात आले. { इंटरनॅशनल एअरपोर्ट इमिग्रेशन व कष्टम सुविधा { इमिग्रेशन काउंटर- ४ { सेल्फ चेक इन काउंटर- ८ { पॅसेंजर बोर्डिंग ब्रीज – २ { अॅप्रन क्षमता- एकाच वेळी ८ मोठ्या बोईंगची सोय होणार { अरायव्हल डोमेस्टीक- ३ बेल्टची सुविधा दिली जाणार { अरायव्हल इंटरनॅशनल- २ बेल्ट प्रवाशांसाठी उपलब्ध { एकाच वेळी देशांतर्गत व आंतरराष्टीय विमानांची पार्किंगची सोय होणार शिर्डी विमानतळावर असे असणार टर्मिनल { बांधकाम : ५४,३१७ चौरस मीटर क्षेत्रावर होणार { खर्च : ६४२ कोटी रुपये { चेकिंग काउंटर : २६ { प्रवेशद्वार : ४

Share

-