छगन भुजबळ राज्यपाल होतील:नाराजी नाट्यादरम्यान भाजप नेत्याच्या दाव्यामुळे राज्यात चर्चा; मुनगंटीवार यांनाही पक्षात मोठे पद?

छगन भुजबळ हे जर नाराज असतील तर त्यांनी सरकारपासून नाराज राहण्याचे काही कारण नसल्याचे भाजप नेते आशिष देशमुख यांनी म्हटले आहे. महायुतीतील प्रत्येक घटक पक्षांनी त्यांचा मानसन्मान कायमच केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या पक्षाने त्यांच्या बाबत मोठा विचार केला असेल, असे देखील आशिष देशमुख यांनी म्हटले आहे. या देशातील एखाद्या राज्याचे राज्यपाल ते होणार असतील, असा देखील दावा आशिष देशमुख यांनी केला आहे. भुजबळांचे मोठे योगदान असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे नक्कीच पुनर्वसन करेल, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज असून नागपूर येथील अधिवेशन सोडून ते नाशिककडे रवाना झाले आहेत. त्यातच त्यांनी माध्यमांशी बोलताना देखील थेट नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलूनच पुढचा निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मला देण्यात आलेल्या वागणुकीमुळे मी दुःखी असल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र, आता त्यांना राज्यपाल पदाचा विचार केला जाऊ शकतो, असे भाजप नेते आशिष देशमुख यांनी म्हटले आहे. मुनगंटीवार यांना पक्षात मोठे पद सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या नेत्याची सरकारमध्ये गरज आहे. त्याचप्रमाणे पक्षांमध्ये त्यांची उपयोगिता असेल, तर त्याचे स्वागत असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. आमच्या सर्वांसाठी ते सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. आमचे वरिष्ठ नेते त्यांचा पक्षात उपयोग करतील, असे देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यावरून आम्हाला वाटत असल्याचे देखील ते म्हणाले. त्यांची नाराजी लवकरच दूर होईल, असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता महाराष्ट्र थांबणार नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीला गती देण्यासाठी सर्वजण एकत्र येऊन, आता जोराने कामाला लागणार असल्याचे देखील देशमुख यांनी म्हटले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… मनोज जरांगेंविरोधात लढण्यासाठी भुजबळांचा वापर केला:आता अश्रू ढाळले तरी त्यांना कोण विचारणार? संजय राऊत यांचा निशाणा ​​​​​​​छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी टोकाची भूमिका घेतली होती. त्यांनी तशी भूमिका घ्यायला नको होती, असे आमचे मत होते. मात्र आता त्यांना ही भूमिका घ्यायला लावली होती, असे दिसत असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे यांच्या विरोधात लढण्यासाठी भुजबळ यांचा वापर करण्यात आला, असा आरोप देखील त्यांनी केला. मात्र आता त्यांनी कितीही आदळउपट केली, अश्रू ढाळले तरी त्यांना कोणी विचारणार नाही. आता त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा…. खाते वाटपाबाबत कुठलाही तिढा नाही:मंत्री उदय सामंत यांचा दावा; आज खातेवाटप जाहीर होण्याचीही व्यक्त केली अपेक्षा​​​​​​​ खाते वाटपाबाबत कुठलाही तिढा नाही. याबाबत दोन दिवसात निर्णय होणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. सरकार विरोधकांना उत्तर द्यायला सक्षम असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी अद्याप खातेवाटप जाहीर झालेले नाही. यावरुन सत्ताधारी पक्षावर विरोधक टीका करत आहेत. या टीकेला सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पूर्ण बातमी वाचा…

Share