आझाद मैदानावर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार:दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवाना; मुंबईत पावसाचा अंदाज

शिवसेनेचा दसरा मेळावा हा महाराष्ट्रातला एक चर्चेचा विषय असतो. दर वर्षी दसऱ्याच्या या मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल होत असतात. मात्र आता शिवसेनेचे दोन मेळावे होत आहेत. एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा तर दूसरा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा हा आझाद मैदानावर होणार आहे. तसेच उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार आहे. दरम्यान या मेळाव्यांवर पावसाचे देखील सावट दिसत आहे.

Share