मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला 5 दिवस उलटूनही मंत्रिमंडळ गठित नाही:शिंदे यांच्या काही मंत्र्यांच्या नावांवर भाजपचा आक्षेप; संभाव्य यादी मंजुरीसाठी अमित शहांकडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीला 5 दिवस पूर्ण होऊनही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या कोट्यातून तानाजी जयवंत सावंत आणि अब्दुल सत्तार या आपल्या जुन्या मंत्र्यांना पुन्हा संधी द्यायची आहे, मात्र शिंदे गटातील काही संभाव्य मंत्र्यांच्या नावांवर भाजपचा आक्षेप आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी अंतिम करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पाठवण्यात आली आहे, अशा दावा जाणकार सूत्रांकडून करण्यात आला आहे. शिंदे यांना आपल्या मर्जीतील आमदारांना करायचे आहे मंत्री विधानसभा निवडणुकीत भाजपचे 132 आमदार विजयी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे अप्रत्यक्षपणे दुर्लक्ष केले जात आहे. त्याची सुरुवात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीची तारीख जाहीर करून केली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सांगितले की, शिंदे शपथ घेवो अथवा न घेवो पण मी फडणवीसांसोबतच शपथ घेणार आणि थांबणार नाही. त्यामुळे गृहमंत्रालयासाठी शिंदे यांनी भाजपवर जो दबाव टाकला होता त्याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट त्यांना फडणवीस आणि पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. आता त्यांना त्यांच्या पक्षातून उदय सामंत, तानाजी सावंत, शंभूराजे देसाई, दादा भुसे, ⁠गुलाबराव पाटील, राजेश क्षीरसागर, ⁠आशिष जैस्वाल, प्रताप सरनाईक, ⁠संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांच्यासारखे आमदारांना मंत्री करायचे आहेत, मात्र यापैकी काही नावांवर भाजपला आक्षेप आहे. अशा प्रकारे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मर्जीतील आमदारांना मंत्री बनवण्याच्या मार्गात भाजपचे महाराष्ट्र पातळीवरील काही प्रभावशाली नेते अडथळे निर्माण करत आहेत. भाजपच्या कोट्यातील ज्या आमदारांना मंत्रीपदे देण्याची चर्चा मंत्रालयात आहे. यामध्ये गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, ⁠चंद्रशेखर बावनकुळे, ⁠संजय उपाध्याय, ⁠योगेश सागर, देवयानी फरांदे, ⁠अनुप अग्रवाल, ⁠संजय कुटे, ⁠चैनसुख संचेती, ⁠नितेश राणे, ⁠माधुरी मिसाळ, ⁠गणेश नाईक, ⁠⁠ शिवेंद्रराजे भोसले, श्रीजया चव्हाण, स्नेहा दुबे यांच्या नावाची चर्चा आहे. पण, भाजप मुख्यालयाशी संबंधित एका सूत्राचे म्हणणे आहे की, ज्या आमदारांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत त्यापैकी बहुतेकांना संधी मिळणार नाही. कारण यावेळी पक्षाला जुन्या-नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची आहे. यावेळी अनेकवेळा मंत्री झालेल्या काही ज्येष्ठ नेत्यांना संघटनेच्या कामाची जबाबदारी दिली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या आमदारांना मंत्री केले जाण्याची शक्यता! उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून छगन भुजबळ, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, दत्ता भरणे यांना मंत्री केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासोबतच ज्येष्ठ आमदार दिलीप वळसे पाटील यांना भविष्यात ईशान्येकडील राज्याचे राज्यपाल बनवण्याची चर्चा आहे. मात्र, वळसे पाटील हे स्वत: मंत्री होण्यासाठी इच्छुक असून त्यांनी राज्यपाल होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

Share